SRH vs GT: 'This is why the team lost..', SRH's Jaydev Unadkat's anger! He blamed 'them' for getting out of the playoffs..
SRH vs GT : आयपीएल २०२५ चा ५१ वा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने हैदराबादचा पराभव केला. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. शुभमन गिलने ३८ चेंडूत ७६ धावांची शानदार खेळीच्या जोरावर गुजरात संघाने सनरायझर्स हैदराबादला अहमदाबादमध्ये 38 धावांनी पराभूत केले. आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा प्रवास हा खूपच वाईट राहिला आहे. हैदराबाद संघाला १० पैकी फक्त ३ सामनेच जिंकता आले आहेत. या हंगामात सातत्याने खराब कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबाद संघाला प्लेऑफच्या शर्यतीतून देखील बाहेर जावे लागले. याबाबत बोलताना संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने प्रतिक्रिया दिली की, आमच्या वेगवान गोलंदाजांनी खूप खराब कामगिरी केलीअ आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या ३६ धावांनी पराभवानंतर जयदेव उनाडकट बोलत होता. टो म्हणाला की, मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल यांना या हंगामात त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडता आली नाही. ज्यामुळे आमच्या संघाला पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर जावे लागले. तसेच गोलंदाजीव्यतिरिक्त, उनाडकटने यासाठी बदलत्या परिस्थितीला देखील दोषी ठरवले.
उनाडकटने सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, आयपीएलमध्ये खेळण्याच्या माझ्या अनुभवावरून मी असे सांगू शकतो की, एखाद्या संघाने चांगली कामगिरी करण्यासाठी त्याच्या गोलंदाजी विभागात तीन किंवा चार खेळाडू असायला हवेत जे सातत्याने चांगली कामगिरी करत असतील. यावेळी आमच्या संघात याची कमतरता जाणवत होती. जर आमचे दोन गोलंदाज चांगली कामगिरी करत होते तर इतर तीन गोलंदाज त्यांना साथ देण्यात कमी पडत होते.
प्रथम गोलंदाजी करणाऱ्या हैद्राबादला गुजरात टायटन्सच्या टॉप ऑर्डरला रोखण्यात अपयश आले, ज्यांनी 6 बाद 224 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात डावाच्या शेवटच्या षटकात उनाडकटने तीन विकेट घेतल्या. तो म्हणाला, ज्याप्रमाणे आपण फलंदाजीच्या संदर्भात भागीदारी पाहत असतो. तसेच मला वाटते की गोलंदाजीत देखील तेच व्हायला हवे.
उनाडकट पुढे म्हणाला की, जेव्हा तुम्ही दोन्ही बाजूंनी चांगली गोलंदाजी करत नसता, तेव्हा दुसऱ्या खेळाडूवर अनावश्यक दबाव निर्माण होतो. यामुळे तुमच्या रणनीतीत बसल होतो. त्यामुळे, आमच्या गोलंदाजी विभागाला स्पर्धेततील आमच्या खराब कामगिरीची जबाबदारी देखील घ्यावी लागेल. सनरायझर्स संघाने गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारली होती, तेव्हा फलंदाजांचे योगदान महत्त्वाचे होते, ज्यांनी त्यांच्या आक्रमक फलंदाजीने नवनवीन मानके प्रस्थापित केली होती. पण यावेळी मात्र त्यांच्या फलंदाजांना काही एक करता आले नाही.