फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
अंबाती रायुडूचे विधान : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. यामध्ये चेन्नईचा संघ सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने या सीझनमध्ये हटके कामगिरी केली आहे. या सीझनमध्ये या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हा दुसरा आणि शेवटचा लीग सामना असणार आहे. हा शानदार सामना बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बेंगळुरूने यापूर्वी पाच वेळा चॅम्पियन संघाचा पराभव केला होता. २००८ नंतर चिदंबरम स्टेडियमवर आरसीबीचा सीएसकेविरुद्धचा हा पहिलाच विजय होता.
गुणतालिकेवर नजर टाकली तर आरसीबी संघ आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये १० सामन्यांतून १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सुपर किंग्ज या सीझनमध्ये आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांमध्ये फक्त दोन विजयांसह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. माजी सीएसके खेळाडू अंबाती रायुडू हा आरसीबीचा कट्टर टीकाकार आहे. बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये कोणतीही मोठी स्पर्धा आहे हे त्यांनी मान्य करण्यास नकार दिला.
डेव्हिड वॉर्नरचा महारेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त 51 धावांची गरज! किंग कोहली रचणार इतिहास
अंबाती रायुडू याने आतापर्यत ६ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत, यामध्ये त्याने ३ मुंबई इंडियन्सच्या संघाकडून जिंकल्या आहेत तर तीन ट्रॉफी चेन्नई सुपर किंग्स संघाकडून जिंकल्या आहेत. अंबाती रायुडू कॉमेंट्री करताना म्हणाला की, “चेन्नईने विरोधी संघाविरुद्ध बरेच सामने जिंकले आहेत म्हणून सीएसके आणि आरसीबीमधील स्पर्धा तितकी मोठी नाही. दोन्ही संघांनी कशी कामगिरी केली आहे हे पाहता सीएसके विरुद्ध मुंबई इंडियन्स स्पर्धा सर्वात मोठी आहे.” रायुडूचे हे विधान आरसीबी चाहत्यांना आवडणार नाही, कारण त्यांना वाटते की गेल्या काही वर्षांत सीएसके-आरसीबी सामना खूप रोमांचक झाला आहे.
शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकिपर), नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना, अंशुल कंबोज, रविचंद्रन अश्विन, कमलेश नागरकोटी, रामेश नागरकोटी, राहुल त्रिपाठी, श्रेयस गोपाल, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, आंद्रे सिद्धार्थ सी, वंश बेदी.
रजत पाटीदार (कॅप्टन), जेकब बेथेल, विराट कोहली, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंग, लेआम लिव्हिंग, बी. स्वप्नील सिंग, लुंगी एनगिडी, फिलिप सॉल्ट, नुवान तुषारा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.