वैभव सूर्यवंशी(फोटो- सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल ) ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने उभे ठोकले होते. या सामन्यात राजस्थानकडून गुजरात टायटन्सला पराभूत व्हावे लागले होते. गुजरातच्या या पराभवाचे वैभव सूर्यवंशी हा कारण ठरला होता. गुजरातने २०९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थानने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर १६ व्या षटकात लक्ष्य गाठले होते. वैभवने फक्त ३५ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. तेव्हापासून हा उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाचा चर्चेत येत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो राजस्थान रॉयल्सचा फलंदाज नितीश राणाकडून बॅट मागताना दिसून येत आहे. तथापि, या काळात नितीश राणा बॅट देण्यास तयार होत नसल्याचे दिसत आहे.
वैभव सूर्यवंशी अनेक वेळा क्रिकेटपटूंकडून बॅट मागताना दिसला आहे. यादरम्यान त्याने नितीश राणाकडून देखील बॅट मागितलीअ आहे. त्यानंतर राणाजींनी अनेक युक्तिवाद केले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : Pahalgam Terrorist Attack : भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील अडचणी वाढल्या! Asia Cup वरही काळे ढग..
राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये राणा म्हणतो, “मी तुला ५ बॅट देईन. जर त्याची संख्या १४ च्या वर गेली तर…” यावर उत्तर देताना सूर्यवंशी म्हणतो, “मला फक्त एकच हवी आहे.” मग राणा गमतीने म्हणतो, “ही माझी बॅट आहे, माझी इच्छा आहे, मी ती का देऊ?” आता राणा ४ बॅट देण्यास तयार होताना दिसतो. पण वैभव यावेळी फक्त १ बॅट मागण्यावर ठाम राहतो. यावरून नितीशला अंदाज येतो की वैभवकडे १०-१२ बॅट्स आहेत, पण वैभव याबाबत नाकारतो. मग तो त्याच्याकडे ८ बॅट असल्याचे सांगतो आणि म्हणतो, “जर माझ्याकडे माझ्या वयापेक्षा जास्त बॅट असतील तर मी माझी बॅट तुम्ही ज्याला सांगाल त्याला देईन.”
Ek Bihari, sab pe bhaari! 😂🔥 pic.twitter.com/6ZqjnfqrmO
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 2, 2025
हेही वाचा : डेव्हिड वॉर्नरचा महारेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त 51 धावांची गरज! किंग कोहली रचणार इतिहास
नितीश हसतो आणि म्हणतो की, तुझ्याकडे १० बॅट आहेत का? १० बॅट तर खूप आहेत, विराट भैयाकडे देखील कदाचित तेवढे नसतील! यावर वैभव म्हणाला की तुमच्या किट बॅगमध्ये १५ बॅट आहेत. वैभवच्या सततच्या आग्रहास्तव, अखेर नितीश राणा बॅट देण्यास तयार होतो आणि म्हणतो, “रोमी सरांना सांगतो की माझी एक बॅट तेलगावमध्ये तुटली. त्यात एक छोटीशी कट आहे, ती घ्या.” हे ऐकून वैभव आनंदी होतो आणि म्हणतो की त्याला बॅट मिळाली, धन्यवाद. असा संवाद या व्हीडिओत दिसून येत आहे.