श्रीलंकेने T20 World Cup साठी संघ केला जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
Sri Lanka has announced a 25-member preliminary squad : फेब्रुवारी२०२६ मध्ये टी-२० विश्वचषकाचा थररार सुरू होणार आहे. ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वचषक सुरू होण्यास ५० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, सर्व संघ या स्पर्धेसाठी त्यांच्या संभाव्य संघांची घोषणा करताना दिसत आहेत. अशातच आता श्रीलंकेने २५ खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर केली आहे. आता या २५ पैकी १५ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
हेही वाचा : AUS vs ENG: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून इंग्लंडला दिला धक्का, रोहित शर्माचा प्रभावी विक्रम मोडला!
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारत आणि श्रीलंकेला संयुक्तपणे यजमानपद भूषवणार आहेत. श्रीलंकेच्या संघाने या स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. श्रीलंकेने विश्वचषकासाठी जारी केलेल्या संभाव्य संघात वरिष्ठ खेळाडूंसह नवीन खेळाडूंचा देखील समावेश आहे. टी-२० विश्वचषकासाठी दासुन शनाकाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. संभाव्य संघात फलंदाज म्हणून पथुम निस्सांका, कुसल मेंडिस, कामिल मिश्रा, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, निरोशन डिकवेला, जानिथ लियानागे, चरिथ असलंका आणि कामिंदू मेंडिस या खेळाडूंचा समावेश आहे.
संभाव्य संघात फलंदाज आणि गोलंदाजांचे संतुलन राखण्यात आले आहे. श्रीलंकेने या विश्वचषकासाठी फिरकीपटूंना प्राधान्य दीलेले दिसून येत आहे. वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे आणि महेश थीकशाना यांच्या व्यतिरिक्त इतर खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या संघात दुष्मंथा चामीरा, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा, इशान मलिंगा, प्रमोद मदुशन, दिलशान मदुशनका आणि मिलान रत्नायके हे वेगवान गोलंदाज आहेत.
श्रीलंकेचा पहिला सामना ८ फेब्रुवारी रोजी आयर्लंडसोबत होणार आहे. श्रीलंकेचा दुसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी ओमानविरुद्ध असेल. तिसरा सामना १६ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल. साखळी फेरीचा अंतिम सामना १९ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे.
The build-up begins as Sri Lanka unveil their 25-member preliminary squad for T20 World Cup 2026 🏆 🇱🇰#T20WorldCup pic.twitter.com/g3fdDH1uIE — ThePapare (@ThePapareSports) December 19, 2025
हेही वाचा : Yuzvendra Chahal News : युझवेंद्र चहलला एकाच वेळी दोन घातक आजारांचे झाले निदान, डॉक्टरांनी दिला हा आदेश
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, पाथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला, जेनिथ लियानागे, चरिथ असालंका, पवन रत्नायके, कामिंदू मेंडिस, सहान अरचिगे, वानिंदू हसरांग, दुहेशानागे, दुहेशानागे, महाशैनी, दुय्यम दुहेरी. हेमंथा, ट्रेविन मॅथ्यू, दुष्मंथा चमीरा, विजयकांत वायस्कांत, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना, इशान मलिंगा, प्रमोद मदुशन, दिलशान मदुशंका, मिलन रत्नायके.






