फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया
Australia vs England 3rd test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने धूमाकुळ घातला आहे. झालेल्या दोन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने दोन्ही सामने जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. सध्या या मालिकेचा तिसरा सामना खेळवला जात आहे. यामध्ये आस्ट्रेलिया संघ आता विजयाच्या देशेने अग्रेसर झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या अॅशेस २०२५ कसोटी मालिकेतील तिसरा सामना अॅडलेड येथे खेळला जात आहे.
ट्रॅव्हिस हेड याची या कसोटी मालिकेमध्ये सातत्याने कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतलेला ऑस्ट्रेलियन संघ आता तिसरा सामना जिंकण्याच्या जवळ आहे. जर ऑस्ट्रेलिया विजयाची हॅटट्रिक करण्यात यशस्वी झाला तर त्यांना मालिकेत अजिंक्य आघाडी मिळेल. अॅडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडने १४६ चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले. या शतकासह त्याने रोहित शर्माचा विक्रमही मोडला आहे.
ट्रॅव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक शतकांचा रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. हेडचे वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमधील हे १० वे शतक आहे. माजी भारतीय कर्णधाराने या स्पर्धेत नऊ शतके ठोकली होती. या १० शतकांसह, ट्रॅव्हिस हेड आता शुभमन गिलच्या बरोबरीने चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम जो रूटच्या नावावर आहे.
TRAVIS HEAD – THE MAN FOR AUSTRALIA. 😍 Tests ✅
ODIs ✅
T20Is ✅ I think Head is the most impactful batter in International cricket in this Decade. 🫡 pic.twitter.com/bnW5JNghjh — Johns. (@CricCrazyJohns) December 19, 2025
जो रूट – २२
स्टीव्ह स्मिथ – १३
केन विल्यमसन – ११
मार्नस लाबुशेन – ११
शुभमन गिल – १०
ट्रॅव्हिस हेड – १०
तिसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत दिसत आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या शतकाच्या जोरावर ३७१ धावा केल्या आणि त्यानंतर इंग्लंडचा डाव २८६ धावांवर संपला. पहिल्या डावात ८५ धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद २१० धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी २९५ धावांपर्यंत वाढवली.






