Sri Lanka ODI Squad for Zimbabwe Tour 2025: झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. चरिथ असलंकाच्या (Charith Asalanka) नेतृत्वाखाली 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संघाचा स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याला या संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर झालेल्या हसरंगाला एकदिवसीय संघातही स्थान मिळाले नाही. हसरंगासोबतच अविष्का फर्नांडो आणि इशान मलिंगा यांनाही संघातून वगळण्यात आले आहे.
पथुम निसांका, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा आणि निशान मदुष्का यांसारख्या प्रमुख फलंदाजांना संघात कायम ठेवण्यात आले आहे. गोलंदाजीची जबाबदारी दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका आणि असिथा फर्नांडो यांच्यावर असेल. त्यांना फिरकी गोलंदाज महेश तीक्षणा, दुनिथ वेल्लालगे आणि जेफरी वँडरसे यांची साथ मिळेल.
Sri Lanka ODI Squad for Zimbabwe Tour 2025
The Sri Lanka Cricket Selection Panel has named the following squad for the ODI series against Zimbabwe.
The team will depart for Zimbabwe tomorrow, 22nd August.#SriLankaCricket #SLvZIM #ODI pic.twitter.com/oEZYjchOfQ— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 21, 2025
25 वर्षीय अनुभवी फलंदाज नुवानिडू फर्नांडो याचे संघात पुनरागमन झाले आहे, ज्याने शेवटचा एकदिवसीय सामना 2024 च्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 22 वर्षीय युवा फलंदाज पवन रत्नायके यालाही त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे प्रथमच संघात संधी मिळाली आहे.
श्रीलंका संघाने गेल्या महिन्यात बांगलादेशला २-१ असे हरवले होते. आता हा संघ २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळेल. त्यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल, ज्यासाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल. नोव्हेंबर २००८ नंतरचा हा श्रीलंकेचा झिम्बाब्वेचा पहिलाच मर्यादित षटकांचा दौरा असेल.
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, नुवानिडू फर्नांडो, कामिंदु मेंडिस, जेनिथ लियानाज, पवन रत्नायके, दुनिथ वेललेज, मिलन रत्नायके, महीश तीक्षणा, जेफरी वँडरसे, असिथा फर्नांडो, दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मदुशंका.