
विरारमध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांचे ५० संघ आमनेसामने
या मानाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल २५ जिल्ह्यांमधून कुमार आणि कुमारी अशा दोन्ही गटांचे मिळून ५० संघ सहभागी होत आहेत. राज्यभरातून आलेले तब्बल ८०० अव्वल खेळाडू या स्पर्धेत आपली चुणूक दाखवतील. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरच राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा अधिकृत कबड्डी संघ निवडला जाणार आहे.
जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद
६ मॅट कोर्ट आणि भव्य प्रकाशझोत; उत्तम सोयी-सुविधा
स्पर्धेचे स्वरूप आणि दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ठेवण्यात आला आहे. यासाठी मैदानात ६ मॅट कोर्ट उभारण्यात आले असून रात्रं-दिवस सामने खेळवण्यासाठी भव्य प्रकाशझोत (डे-नाईट लाईट्स) व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सुमारे ११०० ते १२०० खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची अत्यंत उत्तम व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.
७ ऑक्टोबर: सर्व जिल्ह्यांचे संघ आणि खेळाडू वसई-विरारमध्ये दाखल होतील.
८ ऑक्टोबर (सकाळी): खेळाडूंची वजन प्रक्रिया आणि कागदपत्रांची छाननी.
८ ऑक्टोबर (सायंकाळी ५ वाजता): विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन.
उद्घाटन सोहळ्यात सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंचे शिस्तबद्ध संचलन, ध्वजधारकांचा सहभाग, ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि ब्रास बँडच्या तालावर भव्य सांस्कृतिक वातावरणात स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे.
Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान
पालघर जिल्ह्याला पुन्हा विजेतेपदाची आस
गतवर्षी पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कुमारी गटात पालघर जिल्ह्याच्या मुलींनी अप्रतिम कामगिरी करत अंतिम विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदा मायदेशात खेळताना कुमारी गटासोबतच कुमार गटातही सुवर्णचषक पटकावण्याचा ठाम विश्वास यजमान पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि आयोजकांनी व्यक्त केला आहे.