पुणे शहर कबड्डीचीही राजधानी (फोटो- सोशल मिडिया)
कबड्डीच्या मैदानात ताकद, चपळाई, डावपेच आणि जिद्दीची खरी कसोटी पाहायला मिळणार असून, तब्बल २३० संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. यामध्ये कुमार गटातील मुलांचे १६८ संघ आणि कुमारी गटातील मुलींचे ६२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून अनिल यादव यांनी कामकाज पाहिले, एकुण ५० पंच काम पहात होते. तसेच निरीक्षक म्हणून प्रकाश तात्या बालवडकर यांनी काम पाहिले या स्पर्धेचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटोळे यांनी केले आणि प्रस्तावना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर केली. आभार प्रदर्शन विद्यमान नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केले.
Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
सतेज संस्था बाणेर व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त यांना बाणेर येथे इनडोअर क्रीडांगण उभारण्याकरिता निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने आयुक्तांनी महापालिकेच्या वतीने प्रस्ताव मान्य करून भव्य असे क्रीडांगण उभारण्यात येईल असे जाहीर केले. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचा एक व्यवसायिक कबड्डी संघ तयार करू असेही यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
युवा कबड्डीपटूंच्या पाठीशी : चांदेरे
मातीतल्या खेळाला नवी ऊर्जा देणाऱ्या आणि पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील युवा कबड्डीपटूंना आपल्या क्रीडाकौशल्याची जिद्द, ताकद आणि गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हाच आमचा मानस असून, यासाठी अहोरात्र प्रयत्न करू, असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, या कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.






