'AI' revolution in cricket! Straightbat introduces smart sticker, batsman will know 'this' information along with bat speed in real time..
मुंबई : क्रीडा विश्वात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. त्यातही क्रिकेटबद्दल सांगायच झाल्यास अनेक नव्या तंत्रज्ञानाने क्रिकेट विश्व व्यापले जात आहे. क्रिकेट आता अधिकाअधिक तंत्रज्ञानाकडे वळत आहे. अशातच स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी ब्रँड असणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’ने क्रांतिकारी ‘एआय’वर आधारित स्मार्ट स्टीकर सादर केले आहे. ज्यामुळे कोणत्याही क्रिकेट बॅटचे रूपांतर परफॉर्मन्स अॅनालिटिक्स साधनात करण्यास सक्षम आहे. हे केवळ एक स्टीकर नसून क्रिकेटसाठी नवीन युगातील ‘एआय’वर आधारित तंत्रज्ञान आहे. ज्यामुळे क्रिकेट अधिक सोपे होणार आहे.
दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल आणि किरण मोरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील सीसीआय येथे झालेल्या कार्यक्रमात या स्टीकरचे सादरीकरण करण्यात आले आहे. कॅमेऱ्याशिवाय चालणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’च्या च्या ‘एलिव्हेट’ तंत्रज्ञानावर आधारित हे वजनाने अतिशय हलके स्टीकर फलंदाजाला रिअल टाइममध्ये बॅटचा वेग, स्विंग अँगल, इम्पॅक्ट झोन आदींची माहिती देणार आहे.
हेही वाचा : IND vs ENG : पहिल्या कसोटी पराभवानंतर कोच Gautam Gambhir ची मोठी घोषणा! क्रिकेटप्रेमींचा झाला हिरमोड..
अत्याधुनिक सेन्सर टेक्नॉलॉजीने युक्त असलेले हे स्टीकर ‘एलिव्हेट’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही स्टीकर फलंदाजीतील डेटा मिळवून, त्याचे विश्लेषण करून वापराच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेही बॅटच्या मूळ वजनात किंवा अनुभवात कोणताही फरक न करता सारे होते. कॅमेऱ्याशिवाय चालणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’च्या च्या ‘एलिव्हेट’ तंत्रज्ञानावर आधारित हे वजनाने अतिशय हलके स्टीकर फलंदाजाला रिअल टाइममध्ये बॅटचा वेग, स्विंग अँगल, इम्पॅक्ट झोन आदींची अचूक माहिती पोहचवणार आहे.
भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे म्हणाले, की “या एआय तंत्रज्ञानामुळे देशातील युवा खेळाडूंना त्यांच्या खेळाचे अचूक विश्लेषण प्राप्त करण्यास मदत होणार आहे. मी टेकसॅव्ही माणूस नाही; पण बडोद्यात हे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. बॅटचा वेग आणि वेळेचा मागोवा घेण्यापासून ते हेड पोझिशन आणि बॅलन्सपर्यंत हे तंत्रज्ञान नवख्या खेळाडूंपासून व्यावसायिक खेळांडूपर्यंत प्रत्येक स्तरावरील खेळाडूंना मदत करणारे आहे. दिवसेंदिवस क्रिकेट आधुनिक होत असून, हे तंत्रज्ञान त्याचाच एक भाग आहे.”
तसेच स्ट्रेटबॅ’चे सह संस्थापक आणि सीईओ गगन डागा म्हणाले, की ‘स्मार्ट स्टीकरच्या माध्यमातून आम्ही व्यावसायिक स्तरावरील परफॉर्मन्स ट्रॅकिंग प्रणाली आता सुलभ, स्टायलिश आणि सर्वांनाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आम्ही केवळ अमेरिकेपुरताच विस्तार करत नसून, मुंबईपासून ब्रुकलिनपर्यंत नेक्स्ट जनरेशन क्रिकेट इंटेलिजन्सचा विस्तार करत आहोत.’
ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल म्हणाले की, ‘हे जबरदस्त तंत्रज्ञान असून, आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत की एका साध्या स्टिकरच्या मदतीने स्मार्ट बॅट खेळाडू आणि प्रशिक्षक दोघांनाही इतकी सखोल माहिती देऊ शकते. आता खेळाडू स्वतःलाही प्रशिक्षित करू शकतात किंवा प्रशिक्षकांशी दूरस्थ पद्धतीने काम करू शकतात. सराव किंवा सामन्यांमधून मिळणारा डेटा रिअल-टाइम फीडबॅक देण्यासाठी मदत करीत आहे. जशी ट्रॅकमॅनने गोल्फमध्ये क्रांती घडवली; तशीच क्रांती आता क्रिकेटमध्ये घडणार आहे.”
हेही वाचा : IND vs ENG : भारताच्या पराभवाला कारणीभूत कोण? कर्णधार गिल म्हणाला, ‘खेळाडूंचे फारसे योगदान…’
या सादरीकरणासोबतच ‘स्ट्रेटबॅट’कडून अमेरिकेतील विस्ताराची देखील घोषणा करण्यात आली आहे. कंपनीचे अमेरिकेतही विशेषकरून टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क सारख्या उदयोन्मुख क्रिकेट बाजारांवर लक्ष आहे.