फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी झाले आहेत, त्यामधील ७ संघानी स्पर्धेसाठी टीमची घोषणा केली आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. यजमान पदावरून देशांमध्ये मोठे वाद पाहायला मिळाले. भारताचा संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही यावर क्रिकेट तज्ज्ञ त्याचबरोबर बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यामध्ये मोठे वाद झाले होते. आता चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा भारत पाकिस्तान वादामुळे हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे हे निश्चित झाले आहे.
करुण नायरचं टीम इंडियात नाही होणार पुनरागमन! माजी प्रशिक्षकाने सांगितलं वास्तव
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे भारताचे सर्व सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचे तीन साखळी सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा संघ बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यासोबत लढणार आहे. पहिला भारताचा सामना बांग्लादेशशी २० फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा टीम इंडियाचा महामुकाबला पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना २३ फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. तिसरा आणि शेवटचा साखळी सामना भारताचा न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना भारताचा २ मार्च होणार आहे. या साखळी सामान्यांचा शेवटचा सामना असणार आहे.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार आहे. संघाची घोषणा होण्यापूर्वी टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर आणि अष्टपैलू इरफान पठाण यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी त्यांच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दोघांनीही या संघात जवळपास सर्वच मोठी नावे ठेवली आहेत. गावसकर आणि पठाण यांनी फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जैस्वालचा त्यांच्या संघात समावेश केला आहे, जो आतापर्यंत वनडेमध्ये पदार्पण करू शकला नाही. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल हे निश्चित नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात सलामीला कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिलची निवड निश्चित आहे.
-SUNIL GAVASKAR AND IRFAN PATHAN SQUAD FOR CHAMPIONS TROPHY 😱#INDVENG #ChampionsTrophy2025 #PAKvWI pic.twitter.com/KzIzhQ0XfY
— Sheeno (@cricsheeno) January 18, 2025
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त, दोन्ही स्टार खेळाडूंनी आपल्या संघात वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजची निवड केली आहे. मात्र, या दोघांनी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची या संघात निवड केलेली नाही, ही आश्चर्याची बाब आहे. अर्शदीपचा बॅकअप खेळाडू म्हणून या संघात समावेश करण्यात आला आहे. पाहिल्यास, पठाण आणि गावस्कर यांनी गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेतलेल्या बहुतेक खेळाडूंना या संघात स्थान दिले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी , जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव.