
Concerns for Imran Khan will rise! Sunil Gavaskar and Kapil Dev's problems increase; FIR filed in connection with the letter written by 'that'
FIR filed against Sunil Gavaskar and Kapil Dev : भारताचे दोन महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या दिग्गज माजी खेळाडूंविरुद्ध नागपूरच्या बजाजनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बातमीने शहरातील राजकीय आणि क्रीडा वर्तुळात एकच खळबळ उडाली. तक्रारदाराने दोन्ही दिग्गजांवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ याचिकेवर स्वाक्षरी केल्याचा आरोप करत ते “राष्ट्रहिताच्या विरुद्ध” असल्याचे म्हटले आहे. बुधवारी नागपूर येथील एका स्थानिक नागरिकाने नागपुरातील बजाजनगर पोलिस ठाण्यात माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा : पाकिस्तानी क्रिकेटपटू इमाद वसीमच्या X पत्नीने मोहसीन नक्वीकडे केले अपील! पती ‘खुनी’ असल्याचा केला आरोप
तक्रारदार दीपक कानेटकर यांच्याकडून आरोप करण्यात आला आहे की, दोन्ही माजी कर्णधारांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थनार्थ याचिकेवर स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, तक्रारीत म्हटले आहे की इम्रान खान यांनी यापूर्वी भारताविरुद्ध वादग्रस्त विधाने केली आहेत. अशा व्यक्तीबद्दल सहानुभूती व्यक्त करणे हे राष्ट्रीय हिताच्या विरोधी आहे. अर्जदाराचा असा देखील आरोप आहे की, सध्याचे भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंपासून अंतर राखत असताना, पद्मभूषण सारखा राष्ट्रीय सन्मान मिळालेल्या आदरणीय माजी क्रिकेटपटूंकडून करण्यात आलेली ही कृती अयोग्य आहे.
पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही क्रिकेटपटूंना क्रिकेटशी संबंधित क्रियाकलापांपासून आजीवन बंदी घालावी, तसेच त्यांना टीव्ही भाष्य आणि सार्वजनिक व्यासपीठांवर देखील बंदी घालावी, त्यांच्या नावावर असलेल्या स्टेडियम किंवा स्मारकांचा आढावा घ्यावा आणि भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार मागे घ्यावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासंबंधी तक्रार पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई पोलिस महानिरीक्षक आणि नागपूर पोलिस आयुक्त यांना देखील ही पाठवण्यात आली आहे.
एक गोष्ट इथे लक्ष्यात घ्यायला हवी की, १४ माजी क्रिकेटपटूंनी इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. यामध्ये कपिल देव, स्टीव्ह वॉ, जॉन राईट, मायकेल आथर्टन, सुनील गावस्कर, अॅलन बर्ड, मायकेल ब्रेअरली, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, डेव्हिड गॉवर, किम ह्यूजेस, नासेर हुसेन, सर क्लाईव्ह लॉईड यांच्या नावाचा समावेश आहे.