Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनील गावस्कर यांनी ‘गरजू’ विनोद कांबळीसाठी केली मोठी मदत जाहीर, दरमहा देणार इतके पैसे

बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना या कठीण काळात महान खेळाडू सुनील गावस्कर यांची मदत मिळाली आहे. ही मदत गावस्कर यांच्या चॅम्प्स फाउंडेशनकडून दिली जाणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 15, 2025 | 04:11 PM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

सुनील गावस्कर करणार विनोद कांबळी यांना मदत : बऱ्याच काळापासून भारताचे माजी क्रिकेट खेळाडू विनोद कांबळी यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. यांची बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना या कठीण काळात महान खेळाडू सुनील गावस्कर यांची मदत मिळाली आहे. ही मदत गावस्कर यांच्या चॅम्प्स फाउंडेशनकडून दिली जाणार आहे. याअंतर्गत आता त्याला दरमहा ३० हजार रुपये दिले जातील. याशिवाय, त्याला संपूर्ण वर्षाच्या वैद्यकीय खर्चासाठी वेगळे ३०,००० रुपये देखील मिळणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

कांबळीला गेल्या वर्षी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मूत्रमार्गात संसर्ग आणि पेटके येत असल्याने कांबळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १ जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळण्यापूर्वी त्यांना दोन आठवडे ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही वर्षांत कांबळीला आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. २०१३ मध्ये त्याचा मित्र सचिन तेंडुलकरच्या मदतीने त्याच्यावर दोन हृदय शस्त्रक्रियाही झाल्या.

आयसीसीने श्रेयस अय्यरला दिला मोठा सन्मान, खेळाडूचे एका खास यादीत झाले नाव सामील

गावस्कर डिसेंबरमध्ये कांबळीला भेटले, डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईतील शिवाजी पार्क येथे दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनादरम्यान गावस्कर यांनी कांबळीला मदत करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर गावस्कर आणि कांबळी एकमेकांना भेटले. अशाप्रकारे, आता महान भारतीय फलंदाजाने अखेर आपले वचन पूर्ण केले आहे.

🚨 A GREAT GESTURE BY SUNIL GAVASKAR 🚨 Sunil Gavaskar foundation will provide 30,000 rs monthly for Vinod Kambli for rest of his life starting from April 1st and additional 30,000 rs annually for medical expenses. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/bLplVtymoH — Johns. (@CricCrazyJohns) April 15, 2025

कांबळीच्या पत्नीने केला होता मोठा खुलासा

जानेवारीच्या सुरुवातीला, कांबळीची पत्नी अँड्रिया हेविटने खुलासा केला की तिने २०२३ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता परंतु तिच्या पतीची ‘असहाय्य स्थिती’ पाहून ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. स्वतंत्र पत्रकार सूर्यांशी पांडे यांनी आयोजित केलेल्या पॉडकास्ट दरम्यान, अँड्रिया यांनी खुलासा केला की तिने आधी कांबळी सोडण्याचा विचार केला होता, परंतु नंतर तिच्या तब्येतीमुळे तिने तिचा विचार बदलला.

सोशल मीडियावर काही महिन्यापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये विनोद कांबळी यांना नीट चालता देखील येत नव्हते. त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला एका व्यक्तीची गरज लागत होती. त्यानंतर भारतीय अनेक खेळाडूंनी त्यांना मदत केली आणि त्यांची भेटही घेतली होती. त्याचबरोबर वानखेडेवर झालेल्या कार्यक्रमामध्ये देखील विनोद कांबळी यांची झलक काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती.

Web Title: Sunil gavaskar announced a big help for vinod kambli will give this much money every month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • cricket
  • Sunil Gavaskar
  • Vinod Kambli

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
2

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
3

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.