फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा संघ फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे. त्यामुळे भारताचा संघ मैदानात सराव करत आहे. भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. आता टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा संघ कशी कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल. त्याआधी भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत याला आगामी सामान्यांसाठी सल्ला दिला आहे.
सुरेश रैनाने ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी आणि त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी एक मोठा सल्ला दिला आहे. भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अधिक जबाबदारीने फलंदाजी करण्यास सांगितले आहे. ऋषभ पंतला संजू सॅमसनच्या पुढे स्थान देण्यात आले आहे, ज्याची एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा चांगली सरासरी आहे आणि त्याने टी२० क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
IPL 2025 : KKR संघातून वेगळे होण्यावर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच तोडले मौन, वाचा सविस्तर
तथापि, ऋषभ पंत वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पहिला यष्टीरक्षक असेल की नाही हे अद्याप निश्चित नाही, कारण या फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलची आकडेवारी मजबूत आहे. अशा परिस्थितीत तो हातमोजे सांभाळण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. ३१ सामन्यांनंतर पंतचा ५० षटकांचा विक्रम सामान्य आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी ३३.५ आहे आणि त्याने फक्त ८७१ धावा केल्या आहेत. तो या फॉरमॅटमध्ये बराच काळ नियमित यष्टिरक्षक फलंदाज आहे, पण यावेळी केएल राहुलकडे अधिक दावा आहे.
स्टार स्पोर्ट्सवर सुरेश रैना म्हणाला, “त्याने यष्टिरक्षणात खूप सुधारणा केली आहे, ऋषभ पंतला अधिक जबाबदारीने खेळावे लागेल कारण ही ५० षटकांची स्पर्धा आहे. इंग्लंडसोबतच्या आगामी मालिकेत तुम्हाला ३ वनडे सामने खेळावे लागणार आहेत. होय, ऋषभ पंतसाठी ही चांगली संधी असणार आहे. सुरेश रैनाने सांगितले की, जर ऋषभ पंत मधल्या फळीत ४०-५० चेंडू खेळू लागला तर तो भारतासाठी सामना संपवू शकतो.
तो म्हणाला, “तुम्ही कसे खेळता यावर हे अवलंबून आहे, मला वाटते की जर यशस्वी क्रमवारीत वरच्या स्थानावर खेळत नसेल तर ऋषभ पंतची भूमिका खूप महत्त्वाची असेल, तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो हार्दिक सोबत पहिल्या स्थानावर फलंदाजी करू शकतो, कारण ऋषभने ४०-५० चेंडू खेळले तर तो सामना पूर्ण करू शकतो, त्याला स्वत:ला सांगायचे आहे की मी पन्नास चेंडू खेळले तर मी ८० धावा करू शकतो. त्याच्यासाठी क्रिझवर काही वेळ घालवणे महत्त्वाचे आहे, जर त्याने काही चुका केल्या तर त्याला खूप त्रास होईल, कारण त्याच्याकडे ती प्रतिभा आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर असणार आहे.”