फोटो सौजन्य - सोशल मीडिया
श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ : इंडियन प्रीमियर लीगचा नवा सिझन लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने संघ सोडला त्याचबरोबर केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा संघ सोडला. एवढेच नव्हे तर आयपीएल २०२४ चे चॅम्पियन संघ श्रेयस अय्यर देखील मेगा ऑक्शनचा भाग होता. आता आयपीएल २०२५ मध्ये श्रेयस अय्यर पंजाब किंग्सच्या संघामधून खेळताना दिसणार आहे तर रिषभ पंत लखनौ सुपर जायंट्स आणि केएल राहुल दिल्ली कॅपिटल्सच्या संघामधून खेळेल.
श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी, आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने अय्यरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते, तरीही केकेआरने श्रेयसला कायम ठेवले नाही. केकेआरचा हा निर्णय चाहत्यांसाठीही आश्चर्यचकित करणारा होता. आता श्रेयस अय्यरने केकेआर सोडल्यानंतर पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
Champions Trophy 2025 : 390 ची सरासरी, 5 शतके…करुण नायरला संघात परतण्यासाठी काय करावे लागेल?
ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाने जेतेपद पटकावले आणि पुढच्याच हंगामात संघ त्याला कायम ठेवत नाही, ही गोष्ट सर्वांनाच चकित करते. केकेआरचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरच्या बाबतीतही असेच घडले. आता प्रथमच अय्यरने केकेआर सोडण्याबाबत मौन सोडले आहे. Idea Exchange शी बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “KKR सोबत चॅम्पियनशिप जिंकण्याचा मला नक्कीच आनंद झाला. चाहत्यांची संख्या मोठी होती, ते स्टेडियम उत्साहाने भरले होते आणि मी तिथे घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला.
तो पुढे म्हणाला, “म्हणजे नक्कीच, आम्ही आयपीएल चॅम्पियनशिपनंतर लगेच बोललो, परंतु काही महिने कोणतीही चर्चा झाली नाही आणि टिकवून ठेवण्याबाबत फारसे प्रयत्न केले गेले नाहीत. मला आश्चर्य वाटले की काय होत आहे. त्यामुळे, संवादाच्या कमतरतेमुळे आम्ही अशा परिस्थितीत आलो की आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.”
🚨📰| Shreyas Iyer On interactions with KKR:
– For months, there was no effort in having a retention talk. we decided to part ways, mutually. If you get to know things one week prior to the retention date, then obviously something is lacking. [Express Sports] pic.twitter.com/zPWxKMNBw1
— Pick-up Shot (@96ShreyasIyer) January 20, 2025
श्रेयस अय्यर म्हणाला, “होय, नक्कीच निराश झालो, कारण जेव्हा तुमच्याकडे संवादाची निश्चित ओळ नसते आणि जर तुम्हाला रिटेंशन तारखेच्या एक आठवडा आधी गोष्टी कळल्या तर नक्कीच काहीतरी गहाळ होते. त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला. जे लिहिले आहे ते घडले पाहिजे. पण त्याशिवाय, मी फक्त असे सांगू इच्छितो की शाहरुख सर, कुटुंबासह मी तिथे घालवलेला वेळ, ते सर्व आश्चर्यकारक होते आणि अर्थातच चॅम्पियनशिप जिंकणे हा कदाचित माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता.