Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Switzerland beat Colombia: ७२ वर्षांनंतर स्वित्झर्लंडची ऐतिहासिक झेप; पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचा पराभव

Switzerland beat Colombia in FIFA World cup 2026 enters quarterfinal: स्वित्झर्लंडने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने हरवून फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 08, 2026 | 03:40 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ७२ वर्षांनंतर स्वित्झर्लंडची ऐतिहासिक कामगिरी
  • कोलंबियाला हरवत क्वार्टर फायनलमध्ये धडक
  • रुबेन वर्गासने केला पेनल्टीवर निर्णायक गोल
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World cup 2026) च्या राउंड ऑप १६ च्या फेरीतील अंतिम सामना बीसी प्लेस व्हँकुव्हर स्टेडियमवर स्वित्झर्लंड आणि कोलंबिया यांच्यात खेळला गेला. रोमांचक पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाला ४-३ ने पराभूत करून स्वित्झर्लंडने (Switzerland beat Colombia)  फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. ९० मिनिटे आणि अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला. रुबेन वर्गासने निर्णायक पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून स्वित्झर्लंडचा विजय निश्चित केला. यासह, उपांत्यपूर्व फेरीतील सर्व आठ संघांची नावे निश्चित झाली आहेत.

अन्यायाची परिसीमा? टीम इंडियामध्ये Sanju Samson साठी दरवाजे बंद? गौतम गंभीरच्या विधानाने खळबळ

७२ वर्षांनंतर स्वित्झर्लंड उपांत्यपूर्व फेरीत

या विजयामुळे स्वित्झर्लंडने इतिहास रचला आहे. १९५४ नंतर प्रथमच हा संघ फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. १९५४ मध्ये, स्वित्झर्लंडने या स्पर्धेचे आयोजन केले होते आणि संघ अंतिम आठ संघांमध्ये पोहोचला होता. आता, ७२ वर्षांनंतर, संघाने पुन्हा ही कामगिरी केली आहे.

रुबेन वर्गासने केला पेनल्टीवर निर्णायक गोल

सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झालेल्या प्रमुख खेळाडू योहान मझांबीशिवाय स्वित्झर्लंड संघ कोलंबियाविरुद्धच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यासाठी मैदानात उतरला. कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात स्वित्झर्लंडने अत्यंत डिफेन्सिव्ह खेळ केला, ज्यामुळे कोलंबियाला दोन्ही हाफमध्ये गोल करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. पहिल्या तीन पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांनी गोल केले, परंतु कोलंबियाला चौथ्या प्रयत्नात गोल करता आला नाही. स्वित्झर्लंडच्या रुबेन व्हार्गासने चौथ्या संधीचे गोलमध्ये रूपांतर केले आणि आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Switzerland are through to the @FIFAWorldCup quarter-finals for the first time since 1954! 👏🇨🇭 pic.twitter.com/4thteS9a7M — FIFA (@FIFAcom) July 7, 2026

आता अर्जेंटिनासोबत होणार सामना

उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होईल. हा सामना शनिवारी अमेरिकेतील कॅन्सस सिटी येथील ॲरोहेड स्टेडियमवर खेळला जाईल. अर्जेंटिनाने आपल्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच्या सामन्यात इजिप्तला ३-२ ने हरवून अंतिम आठ संघांमध्ये प्रवेश केला आहे.

क्वार्टर फायनलसाठी आठही संघांची नावे निश्चित

१६ संघांच्या फेरीतील सामने संपल्याने, उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले सर्व आठ संघ निश्चित झाले आहेत. या संघांमध्ये गतविजेता अर्जेंटिना, स्वित्झर्लंड, फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, नॉर्वे आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने १० जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे १:३० वाजता फॉक्सबरो येथील बॉस्टन स्टेडियममध्ये फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील सामन्याने सुरू होतील.

लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद

Web Title: Switzerland beat colombia fifa world cup 2026 quarter final ruben vargas penalty shootout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • switzerland

संबंधित बातम्या

Liechtenstein Country: विमानतळ नाही, स्वतःची आर्मी नाही…तरीही ‘हा’ देश जगातील सर्वात श्रीमंत कसा काय?
1

Liechtenstein Country: विमानतळ नाही, स्वतःची आर्मी नाही…तरीही ‘हा’ देश जगातील सर्वात श्रीमंत कसा काय?

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत
2

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.