Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : सामन्यादरम्यान इफ्तारची वेळ झाली…अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूने मैदानावरच सोडला उपवास

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि कॅनडा यांच्यात सामना झाला होता. इस्लामिक कॅलेंडरच्या पवित्र महिन्यातील एक खास क्षण इतिहासात कोरला गेला, ज्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 20, 2026 | 02:09 PM
फोटो सौजन्य - JioHotstar/सोशल मिडिया

फोटो सौजन्य - JioHotstar/सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

अफगाणिस्तानचा शेवटचा सामना कॅनडाविरूद्ध पार पडला, या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने ऐतिहासिक विजय नावावर केला. अफगाणिस्तानच्या संघाने त्याच्या शेवटच्या लीग सामन्यामध्ये 82 धावांनी विजय मिळवला आणि त्यांचे कोच जोनाथन ट्रॉट यांना अलविदा केला. भारतात १९ फेब्रुवारी रोजी रमजानची सुरुवात झाली, त्याच दिवशी २०२६ च्या टी-२० विश्वचषकात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि कॅनडा यांच्यात सामना झाला होता. इस्लामिक कॅलेंडरच्या पवित्र महिन्यातील एक खास क्षण इतिहासात कोरला गेला, ज्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

मैदानाच्या मध्यभागी झद्रानने सोडला उपवास

जेव्हा अफगाणिस्तानने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा रहमतुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झदरान सलामीवीर म्हणून मैदानावर आले. ५.३ षटकात जसकरण सिंगच्या गोलंदाजीवर गुरबाज ३० धावा काढून बाद झाला आणि ड्रिंक्स ब्रेक जाहीर करण्यात आला. या ब्रेक दरम्यान, फजलहक फारुकी झदरानकडे इफ्तार जेवणाची प्लेट घेऊन मैदानात धावला. अशाप्रकारे झदरानने फळे खाऊन आपला उपवास सोडला.

भारत अ महिला संघाने Women’s Asia Cup Rising Stars च्या फायनलमध्ये मारली एन्ट्री! विजेतेपदाच्या लढतीसाठी पाकिस्तानशी सामना होणार?

कोणत्याही खेळाडूसाठी उपवास ठेवून सामना खेळणे कठीण असते, परंतु झद्रानने त्याच्या श्रद्धेशी तडजोड केली नाही, ज्यासाठी त्याचे कौतुक केले जात आहे. एका वापरकर्त्याने ‘एक्स’ वर लिहिले की, “अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू नेहमीच रमजानच्या भावनेचा आदर करतात. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या टप्प्यात, टी२० विश्वचषकातही, आमचे खेळाडू अभिमानाने आणि श्रद्धेने उपवास ठेवतात. फजलहक फारुकी यांनी क्रीजवर असलेल्या इब्राहिम झद्रानसाठी इफ्तार आणला आणि त्यानंतर लगेचच, इब्राहिमने नाबाद ९५ धावा केल्या. हेच त्याला खरा स्टार, श्रद्धेने मजबूत, आपल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आणि आपल्या देशासाठी प्रेरणास्थान बनवते.”

Afghan cricketers always honor the spirit of Ramadan.
Even on cricket’s biggest stage (@T20WorldCup) our players fast with pride and faith.
In this moment, @fazalfarooqi10 offers Iftari to @IZadran18 at the crease and soon after, Ibrahim went on to score an unbeaten 95*.
That’s… pic.twitter.com/JYIgeCE7vF
— Amin Khatir (@AminKhatirAz) February 19, 2026

मैदानाच्या मध्यभागी उपवास सोडल्यानंतर, इब्राहिम झद्रानने आक्रमक फलंदाजी सुरू केली. त्याने १६९.६४ च्या स्ट्राईक रेटने ५६ चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे अफगाणिस्तानने २० षटकांत चार गडी गमावून २०० धावांचा मोठा धावसंख्या उभारला. प्रत्युत्तरादाखल, कॅनडाला आठ गडी गमावून फक्त ११८ धावा करता आल्या आणि रशीद खानच्या संघाने ८२ धावांनी सामना जिंकला.

Web Title: T20 world cup 2026 it was time for iftar during the match afghanistan cricketer broke his fast on the field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Ibrahim Zadran
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Brian Bennett : 2026 च्या T20 विश्वचषकाचा असा ओपनर ज्याला कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यत आऊट करता आले नाही…
1

Brian Bennett : 2026 च्या T20 विश्वचषकाचा असा ओपनर ज्याला कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यत आऊट करता आले नाही…

AUS vs OMAN : ओमानसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान! लीग सामन्याचा शेवटचा विजय कोणाच्या हाती लागणार?
2

AUS vs OMAN : ओमानसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान! लीग सामन्याचा शेवटचा विजय कोणाच्या हाती लागणार?

भारत T20 World Cup 2026 च्या उपांत्य फेरीत पोहोचणार नाही…मोहम्मद आमीरने केली भविष्यवाणी
3

भारत T20 World Cup 2026 च्या उपांत्य फेरीत पोहोचणार नाही…मोहम्मद आमीरने केली भविष्यवाणी

T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या दिग्गज कोचने केला संघाला अलविदा! प्रशिक्षक Jonathan Trott च्या जाण्यावर कर्णधार राशीद भावूक
4

T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या दिग्गज कोचने केला संघाला अलविदा! प्रशिक्षक Jonathan Trott च्या जाण्यावर कर्णधार राशीद भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.