तालिबानने अफगाणिस्तानात चक्क बुद्धिबळावर घातली बंदी; बुद्धीबळ महासंघही बरखास्त
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बुद्धीबळ खेळावर धार्मिक कारणास्तव बंदी घातली आहे. देशातील सांस्कृतिक व खेळांसंबंधित कृतींवर निर्बंध घालण्याचा तालिबानचा कल पुन्हा अधोरेखित झाला आहे. ‘खामा प्रेस’च्या हवाल्याने ANI ने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या “प्रमोशन ऑफ व्हर्च्यू आणि प्रिवेन्शन ऑफ व्हाइस” मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचे विधान, म्हणाले – हे दुःखद आहे
तालिबानने त्यांच्या धार्मिक विचारधारेच्या आधारे बुद्धीबळाला इस्लामिक नियमांनुसार निषिद्ध ठरवत, या खेळावरील सर्व प्रकारच्या कृती तत्काळ थांबवण्याचा आदेश दिला आहे. तालिबानच्या क्रीडामंत्रालयानेही या निर्णयाची पुष्टी केली असून, बुद्धीबळावर अनिश्चित काळासाठी बंदी लागू करण्यात आली आहे.
या बंदीच्या निर्णयामुळे अफगाणिस्तान बुद्धीबळ महासंघही बरखास्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत बुद्धीबळ हा अफगाणिस्तानमध्ये एक बौद्धिक खेळ म्हणून पुन्हा उभरत होता. अनेक खेळाडूंनी आणि उत्साहींनी क्रीडामंत्रालयाकडे आर्थिक आणि प्रशासकीय मदतीची मागणीही केली होती. मात्र, सरकारकडून मिळालेल्या नकारानंतर त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
तालिबान सत्तेवर आल्यापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांवर कठोर निर्बंध लागू करत आहे. महिलांवरही याचा मोठा परिणाम झालेला असून, सहावीच्या पुढील वर्गांमध्ये शिक्षण घेण्यावर बंदी आहे. तसेच, विद्यापीठे व वैद्यकीय शिक्षण संस्थाही महिलांसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
Virat Kohli Test Retirement नंतर क्रिकेट खेळाडूंनी शेअर केल्या काही खास आठवणी!
या पार्श्वभूमीवर बुद्धीबळावर आलेली बंदी ही अफगाण समाजातील बौद्धिक व सांस्कृतिक अभिव्यक्तीवर आणखी गदा आणली जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या निर्णयांना विरोध करत असून, तालिबानवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात हे निर्बंध शिथिल होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालिबानच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानमध्ये बुद्धीबळप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.