फोटो सौजन्य - X
ऋषी सुनक याची पोस्ट : भारताचा स्टार क्रिकेट खेळाडू विराट कोहली याने आज सोशल मीडियावर पोस्ट करून कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली यानंतर संपूर्ण जगालाच मोठा धक्का बसला. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर त्याच्या चाहत्यांकडून अनेक भाऊ प्रतिक्रिया समोर आला त्याचबरोबर बॉलीवूड कलाकार भारतीय क्रिकेट खेळाडू यांच्या अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची प्रतिक्रिया देखील विराट कोहलीच्या निवृत्तीवर समोर आले आहे यावेळी ते फारच दुखी असल्यास त्यांनी सांगितले आहे.
भारताचा संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार होता. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही खेळणार असे वृत्त आधी समोर येत होते. पण या मालिके आधीच दोघांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. ऋषी सुनक यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘या उन्हाळ्यामध्ये आपण विराट कोहलीला शेवटचे क्रिकेटमध्ये पाहू शकणार नाहीत ही खूप दुःखद बातमी आहे तो क्रिकेट खेळलेल्या महान क्रिकेट खेळाडूंपैकी एक आहे एक हुशार फलंदाज एक हुशार कर्णधार अनेक अजिंक्य स्पर्धक आहे आणि त्याने नेहमीच कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवले आहे’.
Sad we won’t get to see @imVkohli one last time this summer.
He has been a legend of the game: a superb batsman, an astute captain and a formidable competitor who always understood the true value of Test cricket.
— Rishi Sunak (@RishiSunak) May 12, 2025
ब्रिटिशचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या प्रतिक्रियेवरून विराट कोहलीची लोकप्रियता आणि क्रिकेटमधील त्याचे महत्त्व दिसून आले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या खेळण्याच्या कारकिर्दीत किंवा काॅमेंटेटर म्हणून मी जे पाहिले आहे त्यावरून, कोहलीने जितके कसोटी क्रिकेटसाठी केले आहे तितके इतर कोणत्याही खेळाडूने केले नाही. त्याची आवड, ऊर्जा आणि वचनबद्धता यामुळे कसोटी स्वरूपाला खूप फायदा झाला आहे. मला आशा आहे की भारतातील पुढची पिढी त्याच्या पातळीचा मानसिक विचार करेल.
भारताचा संघ जून महिन्यामध्ये इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळणार आहे यामध्ये आता बीसीसीआय कोणत्या खेळाडूंकडे टीम इंडियाची कमान देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारताच्या संघांसाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या संघामध्ये कोणाचा समावेश असणार त्याचबरोबर कोणाकडे संघाचे कर्णधार पद असेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.