
सूर्यकुमार यादवचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
गजनफरने जॉश इंग्लिसला 13 रन्सवर केले आउट
पूरन आणि मार्शची लखनौसाठी महत्वाची खेळी
Tata IPL 2026 MI Vs LSG Live Updates: सध्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. आज काही कारणाने हार्दिक पंड्या खेळत नाहीये. सूर्यकुमार यादव आज मुंबईचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौने प्रथम फलंदाजी करून 228 रन्स केले आहेत. मुंबई इंडियन्सला विजयासाठी 229 रन्सची आवश्यकता असणार आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये एडन मारक्रम आणि हिम्मत सिंगने महत्वाची खेळी केली.
लखनौ सुपर जायंट्सची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जॉश इंग्लिस सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. दरम्यान जॉश इंग्लिस केवळ 13 रन्स करून आउट झाला. निकोलस पूरनने लखनौला चांगली सुरुवात करून दिली. त्याने 63 रन्सची खेळी केली. मिशेल मार्शने 44 रन्सची महत्वाची खेळी केली. कर्णधार ऋषभ पंत आजच्या सामन्यात देखील चांगली खेळी करू शकला नाही. 15 रन्स करून आउट झाला. तर अक्षत रघुवंशी 11 रन्स करून आउट झाला.
𝗦𝘂𝗽𝗲𝗿 𝗚𝗶𝗮𝗻𝘁 𝗦𝘁𝗮𝗿𝘁 💪 Mitchell Marsh 🤝 Nicholas Pooran #LSG 90/1 after 6 overs 🤯 Updates ▶️ https://t.co/elXSOvaeig #TATAIPL | #KhelBindaas | #MIvLSG pic.twitter.com/lZacPb2s2D — IndianPremierLeague (@IPL) May 4, 2026
शेवटच्या ओव्हर्समध्ये एडन मारक्रम आणि हिम्मत सिंग महत्वाची खेळी केली. एडन मारक्रमने 31 रन्स आणि हिम्मत सिंगने 40 रन्सची खेळी केली. त्यामुळे लखनौने 228 रन्सपर्यंत मजल मारली आहे. मुंबईला या हंगामातील तिसऱ्या विजयासाठी 229 रन्सची आवश्यकता असणार आहे.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरने सुरुवात केली. मात्र वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या पीचवर ए.एम. गझनफरने मुंबई इंडियन्सला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने जॉश इंग्लिसला आउट केले. कॉर्बिन बॉशने अर्धशतकी खेळी करून सेट झालेल्या निकोलस पूरनला आउट केले. विल जॅक्स या पार्ट टाइम स्पिनरने कर्णधार पंतची विकेट घेतली. तर कॉर्बिन बॉश मिशेल मार्शला आउट केले. रघू शर्माने अक्षत रघुवंशीला आउट केले.
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार.
एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी.