
गुजरात टायटन्ससाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा
हेड टू हेड रेकॉर्डसमध्ये दोन्ही संघ समसमान
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
GT Vs RCB IPL 2026 Head To Head Records: आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीपूर्वी दोन्ही संघांमधील रेकॉर्ड बद्दल जाणून घेतले पाहिजे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 6 वेळा भिडले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ सामने जिंकले आहेत. या ‘डेडलॉक’ला तोडून आज कोणता संघ आघाडी घेणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
हेड टू हेड आकडेवारी
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएलमध्ये हे संघ ६ वेळा आमनेसामने आले असून दोघांनीही ३-३ सामने जिंकले आहेत.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातने २०२५ मध्ये विजय मिळवला होता, त्यामुळे आरसीबीला सतर्क रहावे लागणार आहे.
आजची संभाव्य प्लेइंग 11
आरसीबी: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रासिद सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड. (इम्पॅक्ट प्लेयर: देवदत्त पडिक्कल)
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्रा, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, ग्लेन फिलिप्स, कागिसो रबाडा, अशोक शर्मा.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
बंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. 2026 च्या हंगामातही येथे मोठे स्कोअर पाहायला मिळाले आहेत.ही खेळपट्टी अत्यंत सपाट आणि कडक आहे, ज्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटके खेळू शकतात. सुरुवातीच्या 2-3 ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. परंतु त्यानंतर फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटूंना धावा रोखणे कठीण जाऊ शकते.
आतापर्यंत या मैदानावर 104 आयपीएलचे सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 56 सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.आजचा सामना हाय-स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि शुभमन गिल यांसारख्या दिग्गज फलंदाजांसाठी ही खेळपट्टी रन मशीनसारखी असणार आहे.