फोटो सौजन्य - BCCI
चॅम्पियन ट्रॉफी : टीम इंडिया (Team India) २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी (Champion Trophy 2025) पाकिस्तानमध्ये जाणार की नाही असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. चॅम्पियन वादचा वाद चिघळत चालला आहे. भारताचा संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाणार की नाही यासंदर्भात मीडिया अनेक तर्कवितर्क लावत आहे. परंतु अजुनपर्यत या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती बीसीसीआयने त्याचबरोबर आयसीसीने दिलेली नाही. २०२३ मध्ये आशिया कपमध्येही टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता त्यामुळे हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा श्रीलंका आणि दुबई येथे आयोजित करण्यात आला होता. याचसंदर्भात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने मोठे विधान केले आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीचे (Pakistani bowler Hasan Ali) वक्तव्य सध्या चर्चेत आहे. यावेळी हसन अली म्हणाला की, “जर आपण तिथे (भारतात) खेळणार आहोत, तर त्यांनीही पाकिस्तानात यावे. अनेकांनी अगणित वेळा म्हटले आहे की, खेळांनी राजकारणापासून दूर राहावे. पण जर आपण पाहिले तर वेगळ्या कोनातून, अनेक भारतीय खेळाडूंनी मुलाखतीत सांगितले की त्यांना पाकिस्तानमध्ये खेळायचे आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना आमची स्वतःची धोरणे, देश आणि बोर्ड आहे”.
पुढे ते म्हणाले की, “आमच्या चेअरमनने म्हटल्याप्रमाणे, जर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असेल तर ती पाकिस्तानातच होणार आहे. जर भारताला यायचे नसेल तर आम्ही त्यांच्याशिवाय खेळू. क्रिकेट व्हायला हवे, पाकिस्तानमध्ये खेळले आणि जर भारत “जर तुम्हाला भाग घ्यायचा नसेल, तर याचा अर्थ असा नाही की क्रिकेट संपले आहे. भारताशिवाय इतर अनेक संघ आहेत.”
चॅम्पियन ट्रॉफीचे वाद वाढत चालला आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार असे सांगण्यात आले आहे की, भारताचे सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आयसीसीकडे वेळापत्रक पाठवले आहे. परंतु अजुनपर्यत कोणत्याही बोर्डने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.