Test Cricket Retirement: Big blow to Sri Lankan cricket! 'This' legendary all-rounder retires from Test cricket..
Angelo Mathews Test retirement : टीम इंडियाचे अनुभवी आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज जोडीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाने क्रीडा जगताला आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यानंतर आता क्रीडा जगतातून आणखी एक मोठी बातमी समोर येतआहे. एका दिग्ग्ज अष्टपैलू खेळाडूने कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला आहे. त्यामुळे आता संघाला टीमला मोठा धक्का बसला आहे. आम्ही श्रीलंकेचा अनुभवी बॅटिंग ऑलराउंडर अँजेलो मॅथ्यूजबद्दल बोलत आहोत. अँजेलो मॅथ्यूजने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घेत असल्याचे जाहिर केले.
हेही वाचा : Cheteshwar Pujara ने केली भारताच्या All-Time Test XI ची घोषणा : असा संघ होणे नाही, वाचा सविस्तर
अँजेलो मॅथ्यूज याने 4 जुलै 2009 रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कसोटी पदार्पण केले होते. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6 फेब्रुवारी 2025 रोजी त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अँजेलो मॅथ्यूज याने या कालावधीत एकूण 16 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 118 कसोटी सामने खेळले आहेत. अँजलोने 48.46 च्या स्ट्राईक रेटने आणि 44.63 या सरासरीने एकूण 8 हजार 167 धावा केल्या आहेत. अँजलोने कसोटी क्रिकेटमध्ये 1 द्विशतक, 16 शतकं आणि 45 अर्धशतकं लागावळी आहेत. तसेच अँजलोने 86 डावात बॉलिंग करताना एकूण 33 विकेट्स देखील मिळवल्या आहेत.
हेही वाचा : LSG vs GT : Mitchell Marsh ने रचला इतिहास! IPL 2025 मध्ये शतक झळकवणारा बनला पहिला परदेशी फलंदाज
कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत अँजेलो मॅथ्यूजने आपले पहिले अर्धशतक लगावेल होते. त्याचे पहिले शतक सप्टेंबर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच ठिकाणी आले होते. मायदेशात आणि इंग्लंड, यूएईसारख्या देशांमध्ये त्याचे चमकदार रेकॉर्ड राहिले आहेत.
— Angelo Mathews (@Angelo69Mathews) May 23, 2025
अँजेलो मॅथ्यूजच्या नावे एक खास कामगिरी देखील आहे. तो फेब्रुवारी २०१३ मध्ये, तो २५ वर्षांचा असताना श्रीलंकेचा सर्वात तरुण कसोटी कर्णधार बनला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत (२०१४) मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात अँजेलो मॅथ्यूजने श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व केले होते. २०२० मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या ही ४२८ चेंडूत २०० धावा अशी राहिली आहे.
विराट कोहली १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा केली होती. विराटच्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीने देखील निवृत्ती जाहीर केली. या निर्णयाने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.