चेतेश्वर पुजारा(फोटो-सोशल मीडिया)
Cheteshwar Pujara India’s All-Time Test XI : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारत इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील लवकरच केली जाणार आहे. त्यापूर्वीच, टीम इंडियामधून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी स्वरूपातील सर्वकालीन परिपूर्ण प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलीय आहे.
स्पोर्ट्स टॅकमधील एका वृत्तानुसार, ३७ वर्षीय पूजाराने सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांची सलामी फलंदाज म्हणून निवड केली आहे. या दोन दिग्गज फलंदाजांच्या शैलीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. गावस्कर यांनी देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १२५ कसोटी सामने खेळले. असून या त्यांनी दरम्यान २१४ डावांमध्ये ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या आहेत. गावस्कर व्यतिरिक्त, सेहवागने टीम इंडियासाठी १०४ सामने खेळले असून त्याने ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएल गाजवून सोडणारा Vaibhav Suryavanshi परतला घरी, असे झाले खास स्वागत..
चेतेश्वर पुजाराच्या प्लेइंग इलेव्हनमधील मधली फळीही खूप मजबूत असल्याचे दिसते आहे. त्याने ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला तिसऱ्या स्थानावर खेळवले आहे. तर सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानावर ठेवले आहे. तर पाचव्या स्थानावर विराट कोहलीचे नाव आहे, ज्याने आता नुकतीच कसोटी निवृत्तीची घोषणा केली आहे. स्टायलिश फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला सहाव्या स्थानावर पसंती दिली आहे.
चेतेश्वर पुजाराने धोनीकडे विकेटकीपिंगची जबाबदारी दिली आहे. यष्टीमागे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक असण्यासोबतच, माही फलंदाजीतही महिर आहे. याशिवाय, त्याच्याकडे कर्णधारपदाचाही खूप मोठा अनुभव आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणून, चेतेश्वर पुजाराने माजी कर्णधार कपिल देव यांची निवड केली आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत देव यांनी देशासाठी एकूण १३१ कसोटी सामने खेळले. दरम्यान, त्याच्या बॅटने १८४ डावांमध्ये ३१.०५ च्या सरासरीने ५२४८ धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना, त्यांनी त्याच सामन्यांच्या २२७ डावांमध्ये २९.६५ च्या सरासरीने ४३४ विकेट्स देखील काढल्या आहेत.
हेही वाचा :LSG vs GT : Mitchell Marsh ने रचला इतिहास! IPL 2025 मध्ये शतक झळकवणारा बनला पहिला परदेशी फलंदाज
चेतेश्वर पुजाराने ज्या तीन गोलंदाजांवर विश्वास ठेवला आहे. ते आहेत रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे आणि जसप्रीत बुमराह. अश्विन आणि कुंबळे यांच्या फिरकीची संपूर्ण जगाला चांगलीच ओळख आहे. तर बुमराह आपल्या वेगवान गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना जरब बसवण्यात माहीर आहे.