फोटो सौजन्य - X
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये धुमाकूळ घातला होता. त्याने भारताच्या संघासाठी इंग्लंड विरुद्ध शेवटचा विकेट घेऊन टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या मालिके नंतर मोहम्मद सिराजवर देशाने कौतुकाचा वर्षाव केला. सध्या तो मालिकेनंतर आता विश्रांती करत आहे. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते यावेळी त्याने त्याची कार रेंजरोवर एकूण होत असतानाचा फोटो शेअर केला आहे यामध्ये त्याचा गाडीचा नंबर त्याच्या चाहत्याना पाहायला मिळाला.
मोहम्मद सिराज यांच्या गाडीचा नंबर 73 आहे. आता त्याच्या चाहत्यांनी गाडीचा नंबर पाहिल्यानंतर त्याच्या जर्सीचा नंबर देखील समान आहे म्हणूनच त्याने गाडीचा नंबर हा ठेवला आहे असा अंदाज लावला आहे. शेअर केलेल्या पोस्टला मोहम्मद सिराज याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की स्मिता हास्य आणि राईडसाठी आभारी आहे.
Grateful for the smiles and ride ✌🏻 pic.twitter.com/Di8W3KtAqc
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) August 16, 2025
भारताचा संघ हा आता आशिया कप खेळण्यासाठी दुबईला जाणार आहे. यामध्ये भारताच्या संघाचे पहिले तीन साखळी सामने होणार आहेत. यामध्ये पहिला सामना हा युएई विरुद्ध होणार आहे तर दुसरा सामना हा भारताचा कट्टप प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. तिसरा सामना हा ओमान विरुद्ध खेळवला जाणार. 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यासाठी अजुनपर्यत भारताच्या संघाची घोषणा बीसीसीआयने केलेली नाही.
अँडरसन-तेंडुलकर मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळणे कठीण जाऊ शकते, कारण जसप्रीत बुमराहकडे आक्रमणाची कमान सोपवण्यात येणार आहे. अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यापैकी एक (किंवा दोन्ही) यांना स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. टी-२० विश्वचषकात शेवटचे महत्त्वाचे षटक टाकणारा हार्दिक पंड्या हा संघातील दुसरा वेगवान गोलंदाज असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावाचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि उपकर्णधार अक्षर पटेल हे संघाचे मुख्य फिरकी गोलंदाज असू शकतात.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने शेवटचा ३ डिसेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर आता अय्यर संघात परतू शकतो. आयपीएल २०२५ मध्ये कर्णधार म्हणून त्याने आपल्या संघाचे अंतिम फेरीत नेतृत्व केले. त्याच वेळी, त्याने फलंदाजीने मधल्या फळीतही खळबळ उडवून दिली. रिंकू सिंगबद्दल बोलायचे झाले तर, तो इंग्लिश संघाविरुद्ध अपयशी ठरला. त्यानंतर, आयपीएल २०२५ मध्ये त्याची कामगिरी सरासरी होती. अशा परिस्थितीत, फक्त वॉशिंग्टन सुंदरच अय्यरशी स्पर्धा करू शकतो.