Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Making Of A Cricketer: भावाचे शूज अन् उसनी जर्सी; Kranti Goud चा टीम इंडियापर्यंत प्रवास, वाचा संघर्ष कहाणी

क्रांती गौडने त्यानंतर पूर्णपणे क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले. सीनियर वनडे कप मध्ये क्रांतीने तब्बल 17 विकेट्स पटकावल्या. त्यानंतर यूपी वॉरियर्सने क्रांती गौडला आपल्या संघात सामील करून घेतले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 04:59 PM
The Making Of A Cricketer: भावाचे शूज अन् उसनी जर्सी; Kranti Goud चा टीम इंडियापर्यंत प्रवास, वाचा संघर्ष कहाणी

The Making Of A Cricketer: भावाचे शूज अन् उसनी जर्सी; Kranti Goud चा टीम इंडियापर्यंत प्रवास, वाचा संघर्ष कहाणी

Follow Us
Follow Us:
  • छत्तीसगडमध्ये झाला क्रांती गौडचा जन्म 
  • पोलिस सेवेत होते क्रांतीचे वडील 
  • मध्यप्रदेश अंडर 19 झाले सिलेक्शन 
Kranti Gaud/तेजस भागवत:आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या रणसंग्रामात जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरते, तेव्हा कोट्यवधी देशवासीयांच्या नजरा टीव्ही स्क्रीनवर खिळलेल्या असतात.  आज या स्पर्धेत भारतीय संघ शानदार खेळी करत आहे. अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. मात्र त्यांच्या आजच्या यशामागे त्यांची अफाट मेहनत आणि कष्ट आहेत. सध्या संपूर्ण देशभरात कौतुकाचा विषय ठरलेली क्रिकेटपटू क्रांती गौडची गोष्ट देखील अत्यंत संघर्षमय आणि भावुक करणारी आहे. आज आपण ‘द मेकिंग ऑफ अ  क्रिकेटर‘ या सिरिजमधून क्रांती गौडची कहाणी जाणून घेऊयात.

भारतीय संघाची वेगवान गोलंदाज असलेली क्रांती गौड सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. 2025 च्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत तिने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मात्र इथपर्यंत तिचा पोचण्याचा प्रवास अत्यंत कष्टाचा आणि खडतर असा राहिलेला आहे.

कसे होते क्रांती गौडचे बालपण

क्रांतीचा जन्म 2003 मध्ये 11 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशच्या एका लहानशा गावात झाला. क्रांती गौड आपला पहिला सामना खेळताना स्वतःचे शूज आणि जर्सी देखील नव्हती. क्रांतीने आपला पहिला क्रिकेटचा सामना आपल्या भावाचे शूज आणि एका अनोळखी खेळाडूची जर्सी परिधान करून खेळला होता. तिथपासून आज थेट भारतीय संघात खेळण्याचा प्रवास खरेच थक्क करणारा आहे.

The Making of a Cricketer: ‘प्लास्टिकची बॅट ते…’; इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्री चरणीच्या रूपाने उमललं ‘सुवर्णकमळ’

क्रांती गौडचा मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील घुवारा या एका लहानशा खेडयात झाला. क्रांतीचे वडील पोलिस दलात हवालदार म्हणून सेवा बजावत होते. मात्र इलेक्शन ड्यूटीदरम्यान त्यांचे निलंबन करण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबाला पोलिस क्वार्टर्स सोडावे लागले. भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी क्रांती गौडला अतोनात मेहनत करावी लागली आहे. तिला हे यश एका रात्रीत मिळालेले नाही. क्रांतीने जेव्हा आपला पहिला सामना खेळला त्याच सामन्यात तिने जबरदस्त कामगिरी केली. या कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.

क्रांती गौड ही सध्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून खेळत आहे. तिच्या खेळाकडे एके दिवशी छतरपूर क्रिकेट असोसिएशनची सेक्रेटरी यांचे लक्ष गेले. तिथूनच क्रांती गौडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठीचा प्रवास सुरू झाला. क्रांती त्यानंतर अकादमीमध्ये सराव करू लागली. केवळ 6 महिन्यांमध्ये क्रांती गौडची निवड सीनियर डिव्हिजन क्रिकेटसाठी झाली. त्यानंतर तिने एका वर्षाच्या आतच मध्य प्रदेशच्या अंडर 19 संघासाठी डेब्यू केले. त्यानंतर क्रांतीने अजिबात मागे वळून पाहिले नाही.

क्रांती गौडची क्रिकेटमधील कामगिरी

क्रांती गौडने त्यानंतर पूर्णपणे क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले. सीनियर वनडे कप मध्ये क्रांतीने तब्बल 17 विकेट्स पटकावल्या. त्यानंतर यूपी वॉरियर्सने क्रांती गौडला आपल्या संघात सामील करून घेतले. महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणारी ती सर्वात दुसरी तरुण खेळाडू ठरली.2025 मध्ये क्रांती गौडने आपले स्वप्न पूर्ण केले. या वर्षी तिने भारतीय संघात डेबयू केले. जुलै महिन्यात याच वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळवण्यात आला. या वेळी क्रांतीने तब्बल 6 विकेट्स पटकावल्या. असा रेकॉर्ड करणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध तिने प्लेयर ऑफ द मॅच ची मानकरी ठरली.

The Making of a Cricketer: गल्ली क्रिकेट ते थेट वर्ल्ड कप! Nandini Sharma ने घडवला इतिहास, वाचा संघर्षाची कहाणी

भारताने गेल्या वर्षी वर्ल्डकप जिंकला. वर्ल्ड कप जिंकल्यावर क्रांती गौड आपल्या गावी परतली. त्यावेळेस जे लोक तिला टोमणे मारायचे, तिच्यावर हसायचे, त्याच लोकांनी तिचे मोठ्या उत्साहान आणि आनंदाने स्वागत केले. मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांनी क्रांती गौडचा सुवर्णपदकाने सत्कार केला, तसेच तिला रोक रक्कम बक्षी म्हणउण देण्यात आले. यावलेस क्रांतीने आपल्या वडिलांना पुन्हा नोकरी मिळावी अशी मागणी केली. खरेच या खेळाडूने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वतःला सिद्ध केले आहे.

Web Title: The making of a cricketer kranti gaud success story career struggle cricket journey t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • The Making of A Cricketer

संबंधित बातम्या

गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?
1

गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
2

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

IND W Vs NED W Live: स्मृती अन् शेफालीची ‘हाय व्होल्टेज’ बॅटिंग! टीम इंडियाने ठोकल्या २०९ रन्स
3

IND W Vs NED W Live: स्मृती अन् शेफालीची ‘हाय व्होल्टेज’ बॅटिंग! टीम इंडियाने ठोकल्या २०९ रन्स

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
4

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.