Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुष महिला संघांनी हॉकीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी, तामिळनाडू संघाला केलं पराभूत

महाराष्ट्राने यजमान उत्तराखंड संघाचा ३-० असा धुव्वा उडवून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हॉकी स्पर्धेतील महिलांच्या गटात धडाकेबाज सलामी दिली. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने बलाढ्य तामिळनाडू संघावर २-१ अशी मात केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 06, 2025 | 08:58 AM
पुरुष महिला संघांनी हॉकीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी, तामिळनाडू संघाला केलं पराभूत
Follow Us
Close
Follow Us:

डेहराडून : सध्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हॉकीचे सामने सुरु आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने यजमान उत्तराखंड संघाचा ३-० असा धुव्वा उडवून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हॉकी स्पर्धेतील महिलांच्या गटात धडाकेबाज सलामी दिली. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने बलाढ्य तामिळनाडू संघावर २-१ अशी मात केली.

उत्तराखंड संघाविरुद्ध महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत पहिल्या पंधरा मिनिटातच तीन गोल नोंदविले. उत्कृष्ट सांघिक कौशल्य आणि अचूकता याचा सुरेख मेळ घालीत महाराष्ट्राने या सामन्यात वर्चस्व गाजविले. सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच सानिका माने हिने फिल्ड गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. तिने उत्तराखंड संघाची गोलरक्षक आणि दोन बचाव खेळाडूंना चकवीत अप्रतिम गोल केला. या धक्क्यातून सावरत नाही तोच उत्तराखंड संघावर आणखी एक गोल नोंदविला गेला.

हिमांशी गावंडे हिने जोरदार चाल करीत खणखणीत फटका मारला आणि महाराष्ट्राचा दुसरा गोल नोंदविला. सामन्याच्या चौदाव्या मिनिटाला महाराष्ट्राला गोल करण्याची आणखी एक संधी लाभली या संधीचा पुरेपूर लाभ घेत दुर्गा शिंदे हिने गोल केला आणि महाराष्ट्राला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. महाराष्ट्राला तीन पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेता आला नाही. उत्तराखंड संघाला देखील दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र महाराष्ट्राच्या बचाव फळीने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. साखळी गटामध्ये महाराष्ट्राला झारखंड, मणिपूर, मिझोराम या संघांच्याही आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीनेच महाराष्ट्राचा आजचा विजय हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

India vs England : वरुण चक्रवर्ती पदार्पण करणार, हे दोन खेळाडू 15 महिन्यांनी परतणार! जाणून घ्या भारताचा प्लेइंग 11

चिवट लढतीनंतरच विजय

महिलांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष खेळाडूंना तामिळनाडूविरुद्ध विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. हा सामना त्यांनी २-१ असा जिंकला. महाराष्ट्राकडून कर्णधार व ऑलिंपिकपटू देवेंद्र वाल्मिकी व रोहन पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला तामिळनाडू करून बी सतीश यांनी एकमेव गोल नोंदविला.‌

चुरशीने झालेल्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. दोन्ही संघांनी खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र मात्र त्यांना मध्यंतरापर्यंत यश मिळाले नाही. मध्यंतरानंतर महाराष्ट्राला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत देवेंद्र याने खणखणीत फटका मारून महाराष्ट्राचे खाते उघडले.‌ मात्र त्याचा आनंद काही क्षणच टिकला कारण पुढच्याच मिनिटाला तामिळनाडूने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यांच्या आघाडी फळीतील खेळाडू बी. सतीश याने एकट्याने चाल करीत हा गोल नोंदविला.

त्यानंतर आघाडी घेण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या अखेर ४६ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली त्याचा पुरेपूर लाभ घेत रोहन पाटील याने महाराष्ट्राचा दुसरा गोल नोंदविला. ही आघाडी घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भक्कम बचाव रक्षण करीत तामिळनाडूला बरोबरी साधण्यापासून वंचित ठेवले आणि शानदार विजय मिळविला.साखळी गटामध्ये महाराष्ट्राला उत्तराखंड, हरियाणा व उत्तर प्रदेश यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: The mens and womens hockey teams beat tamil nadu in a thrilling opening for maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • Sports

संबंधित बातम्या

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
1

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

NZ vs WI : न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज जखमी, या स्टार फलंदाजाचे संघात पुनरागमन
2

NZ vs WI : न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज जखमी, या स्टार फलंदाजाचे संघात पुनरागमन

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?
3

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
4

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.