Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात

पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूवर ठोठावण्यात आलेला हा सर्वात मोठा दंड आहे. नसीम शाहने मरियम नवाज यांच्याबद्दल एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने त्यांना 'क्वीन ऑफ लॉर्ड्स' म्हटले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 31, 2026 | 08:36 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Naseem Shah fined by PCB : पाकिस्तान सुपर लीग 2026 चा सिझन सध्या सातत्याने चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही लीग सुरू झाल्यापासून सातत्याने वाद पाहायला मिळाले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाहला त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्याच्यावर कारवाई केली आहे. पीसीबीने त्याला २ कोटी पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूवर ठोठावण्यात आलेला हा सर्वात मोठा दंड आहे. नसीम शाहने मरियम नवाज यांच्याबद्दल एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने त्यांना ‘क्वीन ऑफ लॉर्ड्स’ म्हटले होते. नसीम पाकिस्तान सुपर लीगमध्ये रावळपिंडी संघाकडून खेळत असून, या पोस्टनंतर त्याला सर्व बाजूंनी तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते. नसीम शाह यांच्यावर लादलेला २० दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड हा त्यांच्या केंद्रीय करारातील पगाराचा एक मोठा भाग आहे. ही रक्कम अंदाजे आठ महिन्यांच्या पगाराएवढी असल्याचे मानले जाते. 

बॅटिंग की थट्टा? RR च्या ‘रॉयल’ माऱ्यासमोर CSK ची दांडी गुल; राजस्थानला जिंकण्यासाठी 128 धावांची गरज

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि मरियम नवाज हे पाकिस्तान सुपर लीगच्या ११व्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमातील फोटो शेअर करत, त्यांनी मरियम यांना ‘क्वीन ऑफ लॉर्ड्स’ असे संबोधणारी एक पोस्ट टाकली. नंतर नसीम यांनी स्पष्ट केले की त्यांचे खाते हॅक झाले होते. पीसीबीने याला कराराचा भंग मानले. नसीम शाह यांची पोस्ट समोर आल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले. 

Naseem Shah has been handed what is believed to be the largest fine in Pakistan cricket history after a swiftly deleted tweet from his account appeared to criticise Punjab’s chief minister Maryam Nawaz. Naseem’s PKR 20 million fine (approx. USD $72,000) is worth approximately… pic.twitter.com/nZhLQVnP7d — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 30, 2026

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, ज्याला नसीम यांनी उत्तर दिले. त्यानंतर, ३० मार्च रोजी, एका तीन सदस्यीय समितीने या प्रकरणाची सुनावणी करून त्यांना दोषी ठरवले.  परिणामी, त्यांच्यावर २० दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या प्रकरणी नसीम यांनी आपल्या सोशल मीडिया सल्लागाराला आधीच पदावरून दूर केले आहे.

Web Title: Psl 2026 naseem shah fined rs 2 crore pcb action maryam nawaz was called queen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • cricket
  • Naseem Shah
  • Sports

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
3

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
4

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.