फोटो सौजन्य – X
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने t20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याने कसोटी क्रिकेट मधून देखील निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे असं त्याने सांगितले आहे. भारताच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर काही महिन्यानंतर इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्माने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेचे पाचव्या कसोटी सामन्यात तो सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आला होता.
टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मा यावेळी क्रिकेटमुळे नाही तर एका वेगळ्याच आणि भारी व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला ३८ वर्षीय रोहित सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
The Hundred : SRH संघातील खेळाडू भिडले.. डेव्हिड वॉर्नर बेअरस्टोला केलं पराभुत ; वेल्श फायरचा पराभव
अलीकडेच, तो लंडनमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान स्टँडमध्ये दिसला होता, जिथे तो यशस्वी जयस्वालचे शतक पाहताना आणि चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसला. साउथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू च्या ५० वा वाढदिवसाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची झलक देखील पाहायला मिळाली. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून चाहते खूप आनंदी आहेत.
या व्हिडिओबद्दल सांगायची झाले तर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेट आणि चित्रपट जगातील दोन दिग्गज रोहित शर्मा आणि महेश बाबू हे दोन्ही एकत्र दाखवण्यात आले आहे. थिएटरच्या पडद्यावर वाजणाऱ्या या व्हिडिओमध्ये लिहिले होते, “दोन वेगवेगळ्या जगातील दोन आयकॉन, त्यांच्या संबंधित क्षेत्रातील ट्रेंडसेटर”.
व्हिडिओमध्ये, एकीकडे महेश बाबू पडद्यावर वर्चस्व गाजवत आहे, तर दुसरीकडे रोहित क्रिकेटच्या मैदानावर आपला लूक दाखवताना दिसत आहे. या क्रॉसओवर ट्रिब्यूटने रोहित आणि महेश बाबू दोघांचेही चाहते भावनिक झाले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.
वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून संजू सॅमसन चकीत! सांगितला एक मजेदार किस्सा
महेशला चाहत्यांनी दिलेल्या श्रद्धांजलीच्या या व्हिडिओमध्ये एक भावनिक संदेशही लिहिलेला होता, ” महापुरुषही पडतात, पण पुनरागमन मोठे असते”. या दरम्यान, एकदिवसीय विश्वचषकातील पराभव आणि २०२४ टी-२० विश्वचषक ट्रॉफी उचलण्याचे ऐतिहासिक क्षण दाखवण्यात आले.
महेश बाबू यांचे 50 वा वाढदिवस त्याला शुभेच्छा देण्यात येत होत्या तेव्हा हैदराबादच्या स्टेडियम मध्ये चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. चाहते आनंदाने त्यांच्या जागांवरून उड्या मारत होते, शिट्ट्या वाजवत होते आणि जोरदार घोषणा देत होते आणि चाहत्यांनी ते संस्मरणीय क्षण त्यांच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केले होते.