
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चेन्नई सुपर किंग्स : इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी लवकरच मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये संघाला काही मर्यादित खेळाडूंनाच संघामध्ये स्थान मिळणार आहे. त्यामुळे मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूंना कोणत्या संघामध्ये स्थान मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारताचा आता कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार एमएस धोनी हे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून यांची गणना होते. परंतु आता चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी संघामध्ये कायम राहणार की नाही यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथ यांनी बीसीसीआयला एमएस धोनीला आयपीएल २०२५ साठी ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून ठेवण्याची संधी नाकारली आहे. अलीकडील मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सूचित करण्यात आले आहे की सीएसकेने अलीकडील बैठकीत माजी कर्णधार एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून वागणूक देण्यासाठी बीसीसीआयशी संपर्क साधला होता. परंतु चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना या दाव्यांचे खंडन केले.
हेदेखील वाचा – आयपीएल २०२५ मध्ये रिंकू सिंह या संघामधून खेळणार? खेळाडूने स्वतः केला खुलासा
कासी विश्वनाथ म्हणाले होते की, मला याबाबतीत काहीही माहिती नाही, आम्ही त्यांना कोणतीही विनंती केलेली नाही त्यांनी आम्हाला स्वतः ‘अनकॅप्ड’ खेळाडू संदर्भात नियम ठेवला जाऊ शकतो असे सांगितले आहे. परंतु अजुनपर्यत बीसीसीआयने कोणताही नवा नियम जाहीर केला नाही असे कासी विश्वनाथ म्हणाले.
जुन्या आयपीएल प्लेयर रिटेन्शन नियमानुसार, एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पाच वर्षांहून अधिक काळ निवृत्ती घेतल्यास त्याला ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून फ्रँचायझी राखून ठेवू शकते. हा नियम २००८ च्या उद्घाटन आवृत्तीपासूनच लीगमध्ये लागू करण्यात आला होता. परंतु त्यानंतर २०२१ मध्ये हा नियम बदलण्यात आला आहे, परंतु बीसीसीआय हा नियम पुन्हा बदलू शकते.