
Salman Khan Birthday: Salman Khan could have also owned an IPL team; but why did the 'Dabangg' hero refuse? Read in detail.
Salman Khan would have an IPL team : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयात देखील त्याचा करिष्मा कायम असल्याचे दिसून येत आहे. त्याचे चित्रपट असोत किंवा बिग बॉसमध्ये त्याचे अँकरिंग असो, चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करताना दिसून येतात.पण, सलमान खानबाबत एल खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? सलमान खानला देखील आयपीएल टीमची ऑफर देण्यात आली होती, परंतु दबंग खानने नकार दिला? सलमानने अलीकडेच एका कार्यक्रमात याबाबत उघड केले आहे. सलमानने सांगितले की, २००८ मध्ये तत्कालीन आयपीएल कमिशनर ललित मोदी यांच्याकडून त्याला आयपीएल टीमची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने याला नकार दिला होता.
ललित मोदींकडून बॉलीवूड स्टार्सना आयपीएल टीम खरेदी करण्याची संधी देण्यात आली होती, तेव्हा शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी यांनी ती स्वीकारली होती. शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स खरेदी केली आणि तो अजूनही त्याचा मालक असून शिल्पा शेट्टीने राजस्थान रॉयल्समध्ये आपला हिस्सा खरेदी केला होता. तर प्रीती झिंटाने पंजाब किंग्जमध्ये गुंतवणूक केली, पण सलमानने आयपीएल टीम खरेदी करण्यास नकार दिला. याबाबत बोलताना म्हणाला की, “त्यावेळी आयपीएलची ऑफर देण्यात आली होती, पण मी ती स्वीकारली नाही. मला त्याचा पश्चाताप देखील होत नाही, मी फक्त आनंदी आहे. आता मी आयपीएलसाठी खूप वयस्कर झालो आहे.”
सलमान खानच्या बोलण्याचा कल असा होता की, त्याचे वय आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे तो आता आयपीएलसारख्या मोठ्या आणि दीर्घकालीन वचनबद्धतेसह संघाचे व्यवस्थापन करण्यास अक्षम आहे. सलमानने स्पष्टपणे सांगितले की त्याला या निर्णयाबद्दल कोणता देखील पश्चात्ताप नाही. सलमानने असे देखील सांगितले की, त्याला क्रिकेट आवडते, पण मालक म्हणून नाही तर एक चाहता म्हणून तो त्याकडे बघतो.
२००९ मध्ये एक बातमी समोर आली होती की, सलमान खान नवीन आयपीएल संघासाठी बोली लावू इच्छित आहे. २०१२ मध्ये, डेक्कन चार्जर्स संघ विकला गेला होता तेव्हा त्याचे नाव देखील समोर आले होते, परंतु त्याने ट्विट करून ते स्पष्टपणे फेटाळून लावले होते. कधीकधी अशा देखील अफवा पासरवण्यात आल्या होत्या की, त्याने शाहरुख खानशी शत्रुत्वामुळे ही डिल स्वीकारली नाही. परंतु त्यात काही तथ्य नाही.