फोटो सौजन्य - IndianPremierLeague
IPL 2025 suspended : भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ सध्या एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तथापि, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. आता असे दिसते की लवकरच आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे असे म्हटले जात आहे. पण आयपीएल पुढे ढकलल्याचा मोठा फायदा आरसीबीला झाला आहे. संघातील एक महत्त्वाचा खेळाडू दोन सामन्यांमधून बाहेर पडण्यापासून थोडक्यात बचावला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे. सीमेवरील बिघडत्या परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ देखील एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले. कालच्या या युद्धबंदी नंतर आणखी एक नवे प्रकरण सुरु झाले आहे. तथापि, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, बीसीसीआय रविवारी नवीन वेळापत्रक जाहीर करू शकते. नवीन वेळापत्रकात, स्पर्धेतील उर्वरित सामने फक्त तीन स्टेडियममध्ये आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. भारतीय मंडळाच्या या निर्णयामुळे दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमसह पाच स्थळांचे मोठे नुकसान होणार आहे.
बीसीसीआयच्या योजनेमुळे ५ ठिकाणांचे मोठे नुकसान होणार आहे. आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक रविवारी जाहीर होऊ शकते. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, १६ मे पासून स्पर्धा पुन्हा सुरू होऊ शकते. बीसीसीआय इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामातील उर्वरित सामने फक्त तीन ठिकाणी आयोजित करण्याची तयारी करत आहे. सर्व सामने चेन्नईतील चेपॉक, बेंगळुरूतील चिन्नास्वामी आणि हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होण्याची अपेक्षा आहे. भारतीय मंडळाचा हा निर्णय पाच ठिकाणांसाठी मोठा धक्का ठरू शकतो.
🚨 IPL 2025 REMAINING MATCHES. 🚨
– The IPL likely to be extended till 30th May.
– Bengaluru, Chennai and Hyderabad to host the remaining matches.
– New scheduled to be released by tonight to IPL teams. (Express Sports). pic.twitter.com/rXPCPdpaNS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 11, 2025
यामध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम, धर्मशाळा, जयपूरमधील सवाई मानसिंग, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियमचा समावेश आहे. उर्वरित सामन्यांचे आयोजन या पाच मैदानांवरून काढून घेतले जाऊ शकते. सरकार आणि बीसीसीआयचा असा विश्वास आहे की खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हे मैदान सुरक्षित राहणार नाही. आयपीएल २०२५ बाबत यापूर्वी असे वृत्त आले होते की स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजीच खेळवला जाईल. तथापि, आता असे वृत्त येत आहे की विजेतेपदाचा सामना २५ मे ऐवजी ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो.