Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ पाणी पाजत राहिले, तरी ‘या’ 3 खेळाडूंना मिळणार करोडो रुपये.. 

टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. संघात असे तीन खेळाडू आहेत ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. तरीही हे खेळाडू बेंचवर बसून देखील करोडो रुपयांचे मानकरी ठरणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 09, 2025 | 05:27 PM
Champion Trophy 2025: Even if they only play water in the Champions Trophy, these 3 players will get crores of rupees.

Champion Trophy 2025: Even if they only play water in the Champions Trophy, these 3 players will get crores of rupees.

Follow Us
Close
Follow Us:

Champion Trophy 2025 : आज 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत आणि न्यूझीलंड या संघात अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये फार कमी बदल करत असतो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सपूर्ण स्पर्धेत असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेसाठी निवडलेल्या 15 पैकी फक्त 12 खेळाडूंचाच वापर करण्यात आला आहे. त्याच वेळी, संघात असे तीन खेळाडू आहेत ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. त्यांना अंतिम फेरीत देखील संधी मिळालेली नाही. असे असले तरी उल्लेखनीय बाब अशी की, तिन्ही खेळाडू बेंचवर बसून देखील करोडो रुपयांचे मानकरी ठरणार आहेत.

एक सामनाही न खेळता पैशांची बरसात..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत सर्व सामाने जिंकले आहेत. या दरम्यान संघाने आपल्या प्लेइंग 11 मध्ये फक्त एक बदल केला आहे. पहिल्या दोन सामन्यात खेळलेल्या हर्षित राणाच्या जागी आता वरुण चक्रवर्ती खेळत आहे. याशिवाय, उर्वरित सर्व 10 खेळाडू  प्लेइंग 11 चा भाग राहिले आहेत. त्यामध्ये काही एक बदल केलेला नाही. भारतीय संघातील ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग  यांनी या स्पर्धेत एकही सामना खेळालेला नाही. मात्र, या गोष्टीचा या तिन्ही खेळाडूंच्या कमाईवर कोणताही परिणाम होणार नाहीये.

हेही वाचा : IND vs NZ Final : रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदावर डाग; अंतिम सामन्यात रचला ‘हा’ नकोसा विक्रम..

काय आहेत रूल्स?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( BCCI ) प्लेइंग 11 मधून बाहेर बसलेल्या खेळाडूंचे सामने पुढे ढकलत असते. याशिवाय प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना इतर सर्व सुविधाही या खेळाडूंना दिल्या जातात.  त्याच वेळी, स्पर्धा जिंकल्यानंतर, या तीन खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंइतकीच बक्षीस रक्कम मिळणार आहे. हे खेळाडू बीसीसीआयने जेतेपद पटकावल्याबद्दल जाहीर केलेल्या बक्षिसांचे तितकेच हक्कदार असणार आहेत.

हेही वाचा : IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये 5 हजार कोटी डावावर; अंडरवर्ल्ड बेटिंग मार्केटची ‘या’ संघाला विजयी पसंती..

न्यूझीलंडची अवस्था बिकट..

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत.  या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने 1 विकेट गमावून 127  धावा केल्या आहेत. या बदल्यात 4 विकेट्स गामावल्या आहेत. विल यंग 23 चेंडूत 15 रन काढून वरुण चक्रवर्तीचा शिकार ठरला आहे. फॉर्ममध्ये असणारा रचीन रविद्र 29 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने आपल्या गुगलीवर आऊट केले. तर भरवशाचा फलंदाज केन विल्यमसनही (14 चेंडूत 11 धावा) फार काही करू शकला नाही. त्याला देखील कुलदीपने आपल्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड केला. रवींद्र जाडेजाने  न्यूझीलंडला चौथा झटका दिल आहे. त्याने टॉम लॅथम एलबीडब्लू आऊट  केले. टॉम लॅथमने  30 चेंडूत 14 धावा केल्या आहेत. भारताकडून कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर जाडेजा आणि वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट मिळवली आहे.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंडचा संघाची प्लेइंग इलेव्हन

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि नाथन स्मिथ.

Web Title: These 3 players will get crores of rupees even without playing in the champion trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • Champion Trophy 2025

संबंधित बातम्या

 Rohit Sharma Birthday Special : बड्डे बॉय रोहित शर्माचे ‘हे’ सहा विक्रम माहिती आहेत का? जे प्रत्येक क्रिकेटरला वाटतील हवेसे.. 
1

 Rohit Sharma Birthday Special : बड्डे बॉय रोहित शर्माचे ‘हे’ सहा विक्रम माहिती आहेत का? जे प्रत्येक क्रिकेटरला वाटतील हवेसे.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.