फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
These artists will perform at the IPL opening ceremony : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा नवा सिझन सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्याआधी नुकतेच सर्व कर्णधारांचे फोटोशूट झाले. यामध्ये सर्व संघाचे कर्णधार या उपस्थित होते. आयपीएलचा १८ वा सिझन सुरु होणार आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये रिषभ पंत सर्वात महाग खेळाडू आयपीएलच्या इतिहासातील ठरला. आयपीएलचा शुभारंभ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता १८ व्या सीझनच्या पहिल्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
जगातील या प्रमुख फ्रँचायझी स्पर्धेच्या १८ वर्षांच्या समारोपानिमित्त बीसीसीआय सर्व १३ ठिकाणी विशेष समारंभ आयोजित करणार आहे. आयपीएल २०२५ चे सेलिब्रेशन संपूर्ण हंगामात सुरू राहील, प्रत्येक स्टेडियमवरील पहिला सामना आघाडीच्या कलाकारांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरू होईल. “आम्हाला स्पर्धेत अधिक रंगत आणायची होती जेणेकरून सर्वत्र उपस्थित प्रेक्षकांना उद्घाटन समारंभाचा आनंद घेता येईल. प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांची एक रांग असण्याची आमची योजना आहे.
आयपीएल २०२५ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणी इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर भारतीय स्टार गायक श्रेया घोषाल तिच्या गायनाने प्रेक्षकांची मन तर जिंकली आहेतच आता ती आयपीएलची मेहफिल लुटायला येणार आहे. पंजाबी प्रसिद्द गायक करण औजला सुद्धा आयपीएलच्या या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी पाहायला मिळणार आहे.
केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यापूर्वी ३५ मिनिटांचा भव्य उद्घाटन समारंभ होईल ज्यामध्ये प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटानी सादरीकरण करण्याची शक्यता आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभाबद्दल माहिती देण्यास नकार देताना स्नेहाशिष म्हणाले, “हा एक मोठा सामना आहे ज्यासाठी तिकिटांची मागणी खूप जास्त आहे. बऱ्याच काळानंतर ईडन गार्डन्सवर उद्घाटन समारंभ होत आहे.”
केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिला सामना २२ मार्च रोजी खेळला जाईल. आता या सामन्यात पावसाची शक्यता आहे. वेदर डॉट कॉमच्या मते, सामन्याच्या दिवशी संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान पाऊस पडण्याची १० टक्के शक्यता, रात्री ८ ते ९ दरम्यान ५० टक्के शक्यता आणि रात्री ९ ते १० दरम्यान ७० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना १-१ गुण दिले जातील.