महिला प्रीमियर लीग 2024 सुरू होण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. ही लीग या गुरुवारपासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल परंतु या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्याच्या एक तास आधी म्हणजेच संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. बॉलीवूडचे मोठे स्टार्स यामध्ये थिरकताना दिसणार आहेत.
वरुण धवन, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, शाहिद कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा सारखे सुपरस्टार महिला प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. यादरम्यान शाहरुख खानही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. गेल्या वर्षीच्या उद्घाटन सोहळ्यापेक्षा यंदाचा उद्घाटन सोहळा अधिक भव्य असेल, असे मानले जात आहे.
? Get ready folks
It’s none other than @iamsrk who will celebrate Cricket ka Queendom! ?
Watch #TATAWPL 2024 Opening Ceremony on @JioCinema & @Sports18 LIVE from the M. Chinnaswamy Stadium, Bengaluru.
?️ 23rd Feb
⏰ 6.30 pm
?️ https://t.co/jP2vYAVWv8 pic.twitter.com/GzE6lLUmPS— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 21, 2024
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचे?
वुमन्स प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर पाहता येईल. यासोबतच स्पोर्ट्स-18 वाहिनीवर थेट प्रक्षेपण पाहता येईल.