Now the question of existence..! Out of BCCI's Central Contract, will he still have money to play? This is how Team India's doors will open..
BCCI Central Contract 2025 : बीसीसीआयने २०२४-२५ साठी केंद्रीय करार सोमवारी जाहीर केला. यावेळी बीसीसीआयने करारात ३४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच ९ खेळाडूंना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यानंतर आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, ज्या खेळाडूंना करारात सतहण देण्यात आले नाही. त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळणार की नाही?
खरंतर, यावेळी बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनाही केंद्रीय करारात पुनरागमन झाले आहे. परंतु, अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता देखील दाखवाण्यात आला आहे. करारातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंसाठी हे नक्कीच धक्कादायक बाब असणार आहे. परंतु, या मागील सत्यता अशी आहे की, या खेळाडूंच्या आशा अद्याप संपलेल्या नाहीत.
हेही वाचा : IPL 2025: Virat Kohli च्या फोनमध्ये असे काय? प्रीती झिंटा पाहताच खदाखदा हसली; पहा Video
बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून खेळाडूंना कोट्यवधी रुपये दिले मिळत असतात, त्यांना वार्षिक पगार मिळतो. शिवाय मॅच फी देखील वेगळी देण्यात येते. परंतु, लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, ज्या खेळाडूंना करारात स्थान मिळाले नाही, त्यांचे नेमके काय होणार? ते कसे पैसे कमवणार ? तर याबाबत आपण जाणून घेऊया.
शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, आवेश खान यांसारख्या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पण, टीम इंडियाचे दरवाजे त्यांच्यासाठी अद्याप बंद झालेले नाहीत. कदाचित हे खेळाडू टीम इंडियामध्ये पुन्हा येतील आणि त्यांना पुन्हा त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
या खेळाडूंमध्ये सर्वात चर्चेत असणारं नाव म्हणजे शार्दुल ठाकूर. भविष्यात टीम इंडियामध्ये कोणाला खेळण्याची संधी मिळू शकते? तर तो जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि या मालिकेत शार्दुलला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात शानदार गोलंदाजी करताना दिसून येत आहे. त्यामुळे त्याला या मालिकेत संघाचा भाग बनवता येईल. जिथे तो प्रत्येक कसोटीसाठी १५ लाख रुपये कमवू शकतो.
हेही वाचा : IPL 2025 : अरे दादा, कसला हा संताप? RR च्या फलंदाजाने करवतीने बॅटच कापली..,पहा Video
तसेच साई सुदर्श देखील टीम इंडियात परतू शकतो. असे मानले जात आहे. त्याची कामगिरी खूपच प्रभावी राहिली आहे. त्याने गेल्या वर्षी टी-२० मध्ये पदार्पण केले आणि २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने ३ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. पण त्याला अद्याप केंद्रीय करारात स्थान मिळालेले नाही. तथापि, साई सुदर्शनला इंग्लंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू मिळवण्यासाठी देखील दावेदार मानले जाऊ लागळे आहे. जर साई सुदर्शनने उर्वरित आयपीएल सामन्यात चांगली कामगिरी केली, तर निश्चितच त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता आहे.