IPL 2025 : अरे दादा, कसला हा संताप? RR च्या फलंदाजाने करवतीने बॅटच कापली(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा १८ वा हंगामा चांगलाच रंगात आला आहे. प्रत्येक सामन्यात काही तरी घडताना दिसून येत आहे. ज्यामुळे मैदानातील एखादा क्षण देखील प्रचंड व्हायरल होऊन जातो. आतापर्यंत असे अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओ खूप मजेदार होते, तर काही खूपच गंभीर होते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल किंवा तुमचा विश्वास देखील बसणार नाही. हा व्हायरल होणारा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सचा खेळाडू नितीश राणाचा आहे. त्यामध्ये तो आपली बॅट कापत असल्याचे दिसत आहे.
आपल्या शानदार फलंदाजीसाठी परिचित असणाऱ्या Nitish Rana ला आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत, त्याच्या बॅटवरून तो खेळ दिसलेला नाही, ज्यासाठी त्याला ओळखण्यात येते. त्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. ज्यामध्ये तो करवतीने आपली बॅट कापताना दिसत आहे.
हेही वाचा : IPL 2025: Virat Kohli च्या फोनमध्ये असे काय? प्रीती झिंटा पाहताच खदाखदा हसली; पहा Video
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नितीश राणा करवतीने त्याची बॅट कापताना दिसून येत आहे. त्याने बॅटचे हँडल करवतीने कापले जेणेकरून ते लहान होईल. या व्हिडिओमध्ये त्याच्याकडून सांगण्यात आले आहे की, फलंदाजी करताना त्याला हँडलमध्ये त्रास जाणवत होता. यामुळे वरच्या हातामध्ये वेदना होऊ लागतात. हँडल लहान केल्याने त्याच्या बॅटचे वजन देखील कमी झाले आहे. तो म्हणाला की आता बॅटमुळे त्याला वेदना होणार नाहीत आणि त्याचे वजन देखील कमी झाले आहे.
Nitish and his bat: A 𝘣𝘢𝘵𝘵𝘦𝘳 love story than Twilight?! 💗 pic.twitter.com/4LrvEqdFvf
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 21, 2025
नितीश राणा या आयपीएलमधील सर्व 8 सामन्यांमध्ये संघाच्या प्लेइंग-11 चा भाग राहीला आहे. पण, आतापर्यंत त्याला केवळ १७६ धावाच करता आलेल्या आहेत. ३० मार्च रोजी त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ८१ धावांची खेळी खेळली केली होती. यानंतर, त्याने दिल्लीसोबत खेळलेल्या सामन्यात ५१ धावा केल्या. या दोन डावांव्यतिरिक्त, त्याला आपली खास छाप पडता आलेली नाही.
लागोपाठ चार पराभवांनंतर राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर गेल्यात जमा आहे. आरआर संघाला आतापर्यंत ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. आता, त्यांना कोणत्याही परिस्थितीत उर्वरित ६ सामने जिंकावे लागणार आहेत. तरी देखील त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.