विराट कोहली आणि प्रीती झिंटा(फोटो-सोशल मिडिया)
IPL २०२५ : आयपीएल २०२५ मधील ३७ व्या सामन्यात (२० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करत १५७ धावा केल्या होत्या प्रतिउत्तरात आरसीबीने १९ व्या षटकात १५९ करत विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. त्याने ५४ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर विराट कोहली आणि प्रीती झिंटा एकमेकांना भेटले. तेव्हा त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भेटीदरम्यान विराट कोहलीने त्याच्या फोनवरून प्रीती झिंटाला काहीतरी दाखवले, तेव्हा प्रीती झिंटा मोठ्याने हसायला लागली. दोघांमधील हा क्षण कॅमेऱ्यात शूट झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळा अंदाज लावताना दिसत आहेत. त्यात एक अंदाज असाही आहे की, विराट कोहलीने त्याच्या मुलांच्या खोडसाळपणाचा व्हिडिओ प्रीती झिंटाला दाखवला असावा. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुले अक्षय आणि वामिकाची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. पण अजूनपर्यंत त्याने त्याच्या मुलांचा फोटो उघड केलेला नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहली प्रीती झिंटाला भेटत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जरी दोघेही प्रतिस्पर्धी संघांचे असले तरी देखील त्यांच्यात चांगले नाते दिसून येत आहे. विराट कोहलीचा फोन बघताच प्रीती झिंटा हसताना दिसली. दरम्यान, आता युजर्सकडून असा अंदाज लावायला सुरुवात झाली आहे की, विराट कोहली त्याच्या मुलांचा फोटो प्रीती झिंटाला दाखवत असावा. एका युजरने तर कमेंटमध्ये लिहिले देखील की, विराटने अकायचा फोटो प्रीतीला दाखवला असावा.
Virat Kohli meeting Preity Zinta and PBKS players. 🥹❤️pic.twitter.com/jaMz1HKQLY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2025
हेही वाचा : Rohit Sharma Retirement : अखेर सारेच आले समोर! रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीवर BCCI चे उत्तर..
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पती पत्नी असून ते अक्षय आणि वामिकाचे पालक आहेत. चाहते या दोघांच्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहेत, परंतु दोघांनीही अद्याप त्यांच्या मुलांचे फोटो चाहत्यांसमोर आणलेले नाही. म्हणूनच चाहत्यांना वाटते की त्यांनी त्यांच्या मुलांचा व्हिडिओ प्रीती झिंटाला दाखवण्यात आला असावा. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रीती झिंटा देखील मोठ्याने हसताना दिसून आली.