फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru/Delhi Capitals सोशल मीडिया
Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Playing 11: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या २४ व्या सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. हा सामना बेंगळुरूच्या होमग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. १८ व्या हंगामात, आरसीबीने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत आणि ३ जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने विजयांची हॅटट्रिक साकारली आहे. आता अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ सलग चौथ्या विजयावर लक्ष केंद्रित करेल.
रिषभ पंत यावर्षी दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडली आणि कर्णधार बदलल्यानंतर, दिल्ली चांगल्या लयीत असल्याचे दिसून येत आहे आणि सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने रजत पाटीदारकडे संघाची कमान सोपवली आहे. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये उभे आहेत.
When Delhi’s own Virat Kohli locks horns with the Delhi Capitals, and Bengaluru’s KL Rahul stares down RCB—you know it’s more than just runs.
It’s personal. It’s pride. It’s Rivalry Week! 🔥 #IPLRivalryWeek#IPLonJioStar 👉 #RCBvDC | THU, 10 Apr | 6:30 PM LIVE on Star Sports 1,… pic.twitter.com/55yXOqP1MN
— Star Sports (@StarSportsIndia) April 10, 2025
आरसीबी कोणताही बदल न करता खेळू शकते. दिल्ली कॅपिटल्सने यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. तर बेंगळुरूने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत, रजत पाटीदार कोणताही बदल न करता दिल्लीविरुद्धच्या प्लेइंग ११ मध्ये प्रवेश करू शकतो. संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. फिल साल्ट आणि विराट कोहली संघाला चांगली सुरुवात देत आहेत. देवदत्त पडिक्कल, कर्णधार रजत आणि जितेश शर्माही फलंदाजीत चांगली कामगिरी करत आहेत. कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल आणि जोश हेझलवूड हे गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
GT vs RR : रियान परागच्या विकेटवर वाद! तिसऱ्या पंचाच्या वादग्रस्त निर्णयाचा ठरला बळी, पहा Video
फाफ डू प्लेसिस, केएल राहुल (विकेटकिपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कॅप्टन), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.
दुसरीकडे, विजयाच्या रथावर स्वार होणारी दिल्ली कॅपिटल्स मोठी बदल घडवू शकते. सतत अपयशी ठरणाऱ्या जॅक फ्रेझर मॅकगर्क यांना काढून टाकले जाऊ शकते. त्याच्या जागी, फाफ डू प्लेसिस अंतिम ११ मध्ये परतू शकतो. दिल्लीने गेल्या ३ सामन्यात विजय मिळवला असला तरी, मॅकगर्कने काही विशेष कामगिरी केलेली नाही. त्याने लखनौविरुद्ध १ धाव आणि हैदराबादविरुद्ध ३८ धावा केल्या. चेन्नईविरुद्ध त्याचे खातेही उघडले गेले नाही.
फाफ डू प्लेसिस, केएल राहुल (विकेटकिपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कॅप्टन), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.