Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्याच्या तिकिट विक्रीला सुरुवात; किंमतीसह जाणून घ्या ‘या’ खास सवलती.. 

आशिया कप २०२५ ला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांचा माहमुकाबला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आता सामन्यांच्या टिकीटाच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 03, 2025 | 04:54 PM
Asia Cup 2025: Ticket sales for India-Pakistan high-voltage match begin; Know these special discounts along with prices..

Asia Cup 2025: Ticket sales for India-Pakistan high-voltage match begin; Know these special discounts along with prices..

Follow Us
Close
Follow Us:

India vs Pakistan match tickets go on sale : आशिया कप २०२५ या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा थरार २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय  १५ सदस्यीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. या वेळी आशिया कप हा टी२० स्वरूपात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत आशियातील ८ संघ सहभागी होत आहेत. आशिया कपसाठी, आशियाई क्रिकेट परिषदेकडून सामन्यांसाठी तिकिट बुक करण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आली आहे.

आशिया कप दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या रोमांचक सामन्यासाठी तिकीट पोर्टल ओपन करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रेस निवेदनात असे सांगितले आहे की, चाहते प्लॅटिनम यादीतून तिकिटे खरेदी करताना काही खास ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत. या नवीन ऑफर्समध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तिकीट पॅकेजेसचा समावेश केला गेला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून तीन प्रकारच्या तिकीट पॅकेजेसची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये चाहते हवे ते पॅकेज खरेदी करू शकतात.

हेही वाचा : ICC ODI Team Rankings : एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत अव्वल स्थानी, तर इंग्लंडवर ओढवली मोठी नामुष्की..

तिकीट पॅकेजची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

  1. पॅकेज १ : यामध्ये ग्रुप A सामन्यांसाठी टिकीटांचा समावेश आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईमधील संघ आहेत.   सुरुवातीची किंमत AED ४७५ (भारतीय रुपये ११,०००) आहे.
  2. पॅकेज २: यामध्ये सुपर ४ सामन्यांची तिकिटे असणार आहेत. २० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सुपर ४ फेरीसाठी अव्वल दोन संघ पात्र ठरणार आहेत. या पॅकेजची सुरुवातीची किंमत AED ५२५ (भारतीय रुपये १२,५००) असणार आहे.
  3. पॅकेज ३: तिसऱ्या पॅकेजमध्ये चाहते दोन सुपर ४ सामन्यांसाठी तिकिटे बुक करू शकणार आहेत. – A2 विरुद्ध B2 (२५ सप्टेंबर), A1 विरुद्ध B1 (२६ सप्टेंबर) आणि आशिया कप फायनल (२८ सप्टेंबर). सुरुवातीची किंमत AED ५२५ (भारतीय रुपये १२,५००) आहे.

हेही वाचा : BCCI कडून Virat Kohli ला झुकते माप? लंडनमध्ये पास केली फिटनेस टेस्ट; भारतीय क्रिकेट जगतात गोंधळ

पुढील काही दिवसांमध्ये तिकिटे ऑफलाइन देखील खरेदी करण्यास उपलब्ध होणार आहेत. चाहते दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबीसाठी थेट तिकिटे खरेदी करू शकणार आहेत. याची संपूर्ण माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Web Title: Ticket sales for india pakistan high voltage match in asia cup 2025 begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 04:54 PM

Topics:  

  • Asia cup 2025

संबंधित बातम्या

 AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..  
1

 AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..  

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवला विक्रम रचण्याची नामी संधी! ‘या’ खेळाडूंना देणार धोबीपछाड
2

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवला विक्रम रचण्याची नामी संधी! ‘या’ खेळाडूंना देणार धोबीपछाड

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 
3

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 

Kuldeep Yadav: आशिया कपपूर्वी कुलदीप यादवने सुरू केला नवीन ‘बिझनेस’; क्रिकेट सोडून ‘या’ खेळावर बोलणार!
4

Kuldeep Yadav: आशिया कपपूर्वी कुलदीप यादवने सुरू केला नवीन ‘बिझनेस’; क्रिकेट सोडून ‘या’ खेळावर बोलणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.