इंग्लंड संघ(फोटो-सोशल मीडिया)
ICC ODI Team Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवार, ३ सप्टेंबर रोजी ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीने एकदिवसीय सामन्यांमध्ये संघांची क्रमवारी जाहीर केली आहे. या एकदिवसीय रँकिंगमध्ये इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडचा पुरुष संघ थेट तळाला आठव्या स्थानावर जाऊन बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडचे रेटिंग जास्तच खालवले आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिकेकडून ७ गडी राखून पराभूत झाला होता. आता इंग्लंड संघाचे एकदिवसीय सामन्यांमध्ये रेटिंग ८७ गुण इतके घसरले आहे आणि संघ ८ व्या स्थानी घसरला आहे. तर भारतीय एकडीसवसीय संघ या रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान आहे.
हेही वाचा : AFG vs PAK : अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धोबीपछाड! आशिया कपपूर्वी ‘पठाण’ आर्मीने फोडली डरकाळी..
आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय संघ क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर विराजमान आहे. संघाच्या खात्यात १२४ रेटिंग गुण जमा आहेत. या वर्षी आतापर्यंत खेळलेले सर्व आठ एकदिवसीय सामने भारताने आपल्या खिशात टाकले आहेत. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागलेला न्यूझीलंड संघ १०९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर २०२३ चा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया १०६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याच वेळी, श्रीलंकेचा संघ १०६ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानचा संघ १०० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
पाकिस्तानसह, दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे रेटिंग गुण देखील १०० आहेत. परंतु गुणांच्या टक्केवारीनुसार, दक्षिण आफ्रिका पाकिस्तानच्या मागे आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाचा नंबर येतो. अफगाणिस्तानचा संघ ७ व्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा संघ ८ व्या स्थानावर घसरला आहे. त्याच वेळी, वेस्ट इंडिज ९ व्या स्थानावर आहे तर बांगलादेशचा संघ तळाशी १० व्या स्थानावर आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पुढील दोन सामने अॅडलेड ओव्हल (२३ ऑक्टोबर) आणि सिडनी क्रिकेट ग्राउंड (२५ ऑक्टोबर) येथे होणार आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानने लाज सोडली! हॉकी विश्वचषकावर फिरवले शब्द; दिला भारतात येण्यास नकार