Birthday Special: He gave his heart to his friend's wife, and even friendship became a thing of the past! Today is the birthday of the cricketer who became a villain...
Birthday Special : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजय आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. मुरली विजयचा जन्म 1 एप्रिल 1984 रोजी झाला. मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. तो तामिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला असून तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून देखील खेळला आहे. यापूर्वी, मुरली विजयने 27 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
मुरली विजयने क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. पण, क्रिकेटपेक्षा तो त्याच्या प्रेमकहाणीमुळे गाजला. त्याचा मित्र असलेल्या दिनेश कार्तिकची माजी पत्नी मुरली विजयच्या प्रेमात पडणे हे त्यामागचे मोठे कारण ठरले होते. दिनेश कार्तिक एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे. एकेकाळी मुरली विजय आणि दिनेश कार्तिक हे चांगले मित्र म्हणून ओळखले जात होते. पण एका दिनेशच्या पत्नीसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांची मैत्री फार काळ टिकली नाही आणि त्यांच्यात फुट पडली.
मुरली विजय हा दिनेश कार्तिकसोबत त्याच्या घरी जात असे. अशा स्थितीत विजयचा मित्र दिनेश कार्तिकच्या पत्नीशी त्याचे बोलणे सुरू झाले. यानंतर काही कालावधीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आपली मैत्री विसरून मुरली विजय दिनेश कार्तिकची पत्नी निकिता वंजारा हिच्या प्रेमात बुडून गेला. याच कारणामुळे मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्या मैत्रीत दरी पडली.
आयपीएल सामन्यादरम्यान मुरली विजय आणि दिनेश कार्तिकची पत्नी निकिता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होऊन ती अधिकाधिक वाढू लागली. यानंतर त्या दोघांची चांगली मैत्री झाली. दोघांनाही एकमेकांचा सहावस आणि सवयी आवडायला लागल्या. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम वाढत गेले यानी त्यांना दिनेश कार्तिकसह समाजाला विसर पडला. यानंतर मुरली विजय आणि निकिता यांनी एकमेकांसोबत सहजीवन घालण्याचा निर्णय घेतला.
दिनेश कार्तिकला या प्रकरणाची माहिती मिळताच त्याला मोठा धक्काच बसला. त्याचा परिणाम त्याच्या खेळावर देखील दिसून आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिनेश कार्तिक बऱ्याच दिवस डिप्रेशनमध्ये गेला होता. तो त्याच्या खोलीतून बाहेर सुद्धा येत नसे. पण नंतर मित्राच्या मदतीने तो नैराश्यातून बाहेर पडला आणि नंतर पुन्हा टीम इंडियात परतला.
निकिताने दिनेश कार्तिकपासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर निकिताने लगेच मुरली विजयसोबत लग्न केले. घटस्फोटाच्या वेळी निकिता गर्भवती होती. 2012 ला निकिताने तिचे दुसरे प्रेम असणाऱ्या मुरली विजयसोबत लग्न केले. यानंतर मुरली विजयची क्रिकेट चाहत्यांमध्ये खलनायकी प्रतिमाच निर्माण झाली. सोशल मीडियावर लोकांकडून तो खूप ट्रोल व्हायला लागला. आता मात्र, मुरली विजयचे हे प्रेमप्रकरण शांत झाले आहे. तर, दुसरीकडे दिनेश कार्तिक 2015 साली स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत विवाहबंधनात अडकला.
मुरली विजय हा एक चांगला फलंदाज होता, परंतु, त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या खेळावर चांगलाच परिणाम झाला. त्यामुळे तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आपले करिअर पुढे घेऊन जाऊ शकला नाही. मुरली विजयने 61 कसोटी सामने खेळत 38 च्या सरासरीने 3982 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 331 धावा केल्या आहेत.