माल्कम मार्शलआणि व्हिव्हियन रिचर्ड्स(फोटो-सोशल मीडिया)
Sir Vivian Richardson : सर व्हिव्हियन रिचर्ड्स नेहमी आपलया क्रिकेटविषयीच्या वेगवेगळ्या मतांबाबत स्पष्ट बोलत असतात. सर व्हिव्हियन रिचर्ड्स हे नाव क्रीडा जगतात आदराने घेतले जाते. वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडू सध्याच्या क्रिकेटच्या गोलंदाजाबद्दल बोलले आहेत. त्यांच्यामते या गोलंदाजाला पाहून त्यांना धोकादायक माजी दिग्गज गोलंदाज माल्कम मार्शलची आठवण करून दिली आहे. याबाबत त्यांनी एका भारतीय गोलंदाजाचे नाव घेतले आहे.
माल्कम मार्शल हा जगातील सर्वात धोकादायक गोलंदाज मनाला जातो. 70-80 आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात माल्कम मार्शलच्या गोलंदाजीची सर्वत्र दहशत होती. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणे कोणत्याही फलंदाजाला एक आव्हान असत असे. जागतिक क्रिकेटला आजपर्यंत त्यांच्यासारखा गोलंदाज सापडलेला नाही. परंतु, दिग्गज फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी सध्याच्या क्रिकेटमधील गोलंदाजाचे नाव घेऊन म्हटले आहे की ‘ज्याने मला माल्कम मार्शलची आठवण करून दिली आहे.’
हेही वाचा : MI vs KKR : देव पावला! मुंबई इंडियन्सच्या हाती लागला सीझनचा पहिला विजय, केकेआरला 8 विकेट्सने केले पराभूत
सायरस सेजच्या एका यूट्यूब चॅनलवर बोलत असताना विवियन रिचर्ड्सने त्या गोलंदाजाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. विवियनने भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची तुलना दिग्गज गोलंदाज माल्कम मार्शलबरोबर केली आहे. विवियन रिचर्ड्स म्हणाले की, ‘जसप्रीत बुमराह मला माल्कम मार्शलसारखा धोकादायक गोलंदाज वाटतो. त्याची वेगवान गोलंदाजी मला माल्कम मार्शलची आठवण करून देते.’ असे मत विवियन रिचर्ड्स यांनी मांडले.
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर क्लाइव्ह लॉईड यांनी पुढे मार्शलबद्दल सांगितले की, ‘माल्कम हा एक खास क्रिकेटर होता, खरे तर मी म्हणेन की तो एक ‘अतिरिक्त-विशेष क्रिकेटर’ राहिला आहे. त्याने इतर तीन महान वेगवान गोलंदाजांसोबत विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रकारे विकेट्स शेअर करण्यात आल्या, तरी देखील गोलंदाज म्हणून त्याच्याकडे अप्रतिम असे विक्रम आहे.’
माल्कम मार्शलने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये 81 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 376 विकेट घेतल्या आहेत. त्याने 136 एकदिवसीय सामने खेळले असून या कालावधीत त्याने 157 विकेट्स मिळवल्या आहेत. मार्शल हा 300 कसोटी विकेट घेणारा वेस्ट इंडिजचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला होता. माल्कम मार्शनने 1978 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने 408 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 19 धावा प्रति विकेट ही उत्कृष्ट सरासरी राखत 1,651 बळी टिपले आहेत.