मॅक पतौडी ट्रॉफी (फोटो-सोशल मीडिया)
ECB : आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील वर्चस्वाचे प्रतीक मानली जाणारी मॅक पतौडी ट्रॉफी रद्द करण्याचा विचार सुरू आहे.
असे म्हटले जात आहे की, ईसीबी ट्रॉफी निवृत्त करण्याच्या विचारात आहे. आगामी मालिकेतच याची अंमलबजावणी होताना दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या जून-जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा या मालिकेपासूनच या विचाराची अंमलबजावणी होऊ शकते. असे म्हटले जात आहे.
हेही वाचा : MI vs KKR : देव पावला! मुंबई इंडियन्सच्या हाती लागला सीझनचा पहिला विजय, केकेआरला 8 विकेट्सने केले पराभूत
ट्रॉफी ‘रिटायर’ करण्यामागचे नेमके कारण काय? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेळे नाही. तरी भविष्यात दोन्ही देशांच्या दिग्गज खेळाडूंच्या नावावर नवीन ट्रॉफीचा जन्म झाल्यास तर काही एक आश्चर्य वाटणार नाही. क्रिकबझशी संपर्क साधला असता, इंग्लंड बोर्डाच्या प्रवक्त्याने या प्रकरणाला दुजोरा दिला आहे किंवा नकारही दिलेला नाही.
1961-75 दरम्यान 46 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे माजी भारतीय कर्णधार दिवंगत एमएके पतौडी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे. कुटुंबाच्या जवळच्या एका सूत्राने याबाबत सांगितले की, ईसीबीला हे समजले आहे. काही काळाने ट्रॉफी काढून घेतली जाता असते. असे देखील सूत्राने सांगितले.
हेही वाचा : MI vs KKR : कोण आहे अश्वनी कुमार? मुंबईकडून पदार्पणातच घेतली पहिल्या चेंडूवर पहिली विकेट…
1932 मध्ये भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 2007 मध्ये पतौडी ट्रॉफीची सुरवात करण्यात आली होती. ही ट्रॉफी पतौडी कुटुंबाच्या सन्मानार्थ आणण्यात आली आहे. ज्यामध्ये इफ्तिखार अली खान पतौडी हे इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांसाठी खेळले आणि त्यांचा मुलगा मन्सूर अली खान पतौडी याने भारतीय संघाची दीर्घकाळ कर्णधार म्हणून धुरा वाहिली आहे. ट्रॉफीच्या स्थापनेपूर्वी, भारत आणि इंग्लंडमध्ये 14 मालिका पार पडल्या आहेत. ज्यामध्ये इंग्लंडचे वर्चस्व राहिले आहे. तेव्हापासून ही ट्रॉफी क्रिकेटमधील उत्कृष्टतेचे आणि दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमधील प्रतिस्पर्ध्याचे प्रतीक मानली जाते.
काल 31 मार्च रोजी कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने एकतर्फी विजय मिळवत आयपीएल 2025 च्या 18 हंगामातील पहिला विजय नोंदवला. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने केकेआरला धूळ चारत 8 विकेट्सने पराभूत केले आहे.