हैदराबाद – आयसीसी वनडे वर्ल्डकपला (2023) तसेच क्रिकेटच्या महासंग्रामाला पाच तारखेला सुरुवात झाली आहे. (Icc Cricket World Cup 2023) या चार दिवसांत अनेक महत्त्वाच्या संघाचे सामने पार पडले आहेत. काल भारताने बलाढ्य कांगारुंचा सहा विकटेसनी पराभर करत विजयी सलामी दिली आहे. तर आज न्यूझीलंड आणि नवखा संघ नेदरलँड यांच्यात सामना पार पडणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे खेळविण्यात येणार आहे. हा सामना दुपारी दोन वाजता सुरु होणार आहे. त्यामुळं या सामन्यात बाजी कोण मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (today new zealand vs netherlands match who will be win where can you watch the match for free)
New Zealand look to build on their winning momentum as they take on the Netherlands in Hyderabad ?
Who’s taking home the points today? #CWC23 pic.twitter.com/mFztzYu3Ec
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 9, 2023
दुसऱ्या विजयासाठी किवी सज्ज…
दरम्यान, गतउपविजेता न्यूझीलंड संघाने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेता इंग्लड संघावर दणदणीत विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे. त्यामुळं पहिला सामना जिंकल्यानंतर किवी संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. यानंतर आज स्पर्धेतील दुसरा सामना नेदरलँडबरोबर होत असल्यामुळं किवी संघाचा दुसरा सामना देखील जिंकण्याकडे कल असेल. तर नेदरलँड संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाशी पार पडला. यात नेदरलँडला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं नेदरलँड आज पहिला विजय साकारणार का? याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.
मोफत लाईव्ह सामना कसा पाहता येणार?
वर्ल्ड कप 2023 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिज्नी+हॉटस्टारवर पाहा येतील. तर टिव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर सामने पाहता येणार आहेत. जर तुम्हाला हा सामना तुम्ही मोबाईलमध्ये Disney+Hotstar वर पाहिलात तर तो तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण हा सामान जर अन्यत्र कुठे पाहायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. पण हा सामना त्यांच्या अॅपवर फ्रीमध्ये दाखवला जाणार आहे. त्यामुळे मोबाईलवर आता तुम्हाला फ्रीमध्ये हा सामना पाहायला मिळू शकतो.
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग