फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग : भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना पाहणे म्हणजेच क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानीच आहे. भारत विरुद्ध सामने पाहण्यासाठी क्रिकेट पसंत करणारेच नाही तर ज्यांना खेळ आवडत नाही ते सुद्धा या सामान्याकडे नजर लावून असतात. आज भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामन्याची मेजवानी मिळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप 2024 मधील तिसरा सामना आज , शनिवार, 30 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 29 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
पहिल्या सामन्यात बांग्लादेशबे अफगाणिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने नेपाळचा पराभव केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेतील तिसरा सामना आज होणार असून या सामन्याने दोन्ही संघ आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. टीम इंडियाचे नेतृत्व मोहम्मद अमान करत आहे, तर संघात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीचाही समावेश आहे, ज्याला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पाकिस्तानचा कर्णधार साद बेग असेल. भारत U19 विरुद्ध पाकिस्तान U19 सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया-
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया चषक 2024 तिसरा सामना शनिवार, 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्याचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. आशिया कप 2024 तिसरा सामना IST सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहे.
आज दुबई में Ind vs Pak U19 एशिया कप का तीसरा मुकाबला
🔹मैच भारतीय समयानुसार मैच सुबह 10:30 बजे शुरू होगा।#U19 #IndvPak। #Dubai pic.twitter.com/8tIXtxiPBU
— Vinay kumar🇮🇳 (@Vinaykumar53643) November 30, 2024
भारतीय चाहते भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप 2024 च्या तिसऱ्या सामन्याचे थेट प्रवाह Sony Liv वेबसाइट आणि ॲपवर पाहू शकतात. भारत विरुद्ध पाकिस्तान ACC U-19 आशिया चषक 2024 च्या तिसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Sports Ten 5 SD आणि HD, Sony Sports Ten 3 SD आणि HD टीव्ही चॅनेलवर पाहता येणार आहे.
हार्दिक राज, वैभव सूर्यवंशी, प्रणव पंत, केपी कार्तिकेय, हरवंश सिंग (यष्टीरक्षक), मोहम्मद अमन (कर्णधार), आयुष म्हात्रे, समर्थ नागराज, निखिल कुमार, युधाजित गुहा, चेतन शर्मा, किरण चोरमले, अनुराग कवाडे, आंद्रे सिद्धार्थ सी, मोहम्मद. anon
मोहम्मद तय्यब आरिफ, फरहान युसूफ, शाहजेब खान, साद बेग (डब्ल्यूके/कॅप्टन), हारून अर्शद, अली रझा, अहमद हुसैन, मोहम्मद रियाजुल्ला, उस्मान खान, अब्दुल सुभान, फहम-उल-हक, मोहम्मद हुजैफा, उमर झैब, मोहम्मद अहमद नावेद अहमद खान