फोटो सौजन्य - X
ट्रॅव्हिस हेड : आयपीएल २०२५ पुन्हा एकदा शुभारंभ झाला आहे, सांगायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावामुळे आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा आयपीएल सुरू झाली आहे. सनराइजर्स हैदराबादच्या संघाने या सीजनमध्ये अत्यंत निराशा जनक कामगिरी केली मागील सीझनमध्ये ते 2024 मध्ये उपविजेता ठरले होते पण या सीजनमध्ये त्यांनी त्यांचे चाहत्यांना निराश केले आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२५ चा ६१ वा सामना खेळला जाईल. रविवारी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी ट्रॅव्हिस हेडबाबत एक मोठी अपडेट दिली. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात हेड निवडीसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले आहे. तो म्हणाला की त्याला कोविड झाला आहे, त्यामुळे त्याला भारतात येण्यास उशीर होत आहे.
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
Travis Head likely to miss the clash against LSG as he’s set to arrive in India tomorrow after recently contracting COVID-19. 🤕#IPL2025 #TravisHead #LSGvSRH pic.twitter.com/z53uXtlR1n
— Sportskeeda (@Sportskeeda) May 18, 2025
ऑस्ट्रेलियन फलंदाजाला संसर्ग कधी आणि कुठे झाला याबद्दल हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. व्हेटोरी म्हणाले की, हेड सोमवारी भारतात पोहोचेल आणि त्यानंतर वैद्यकीय पथक त्याची तपासणी करेल. “ट्रॅव्हिस उद्या सकाळी येत आहे, त्याला उशीर झाला आहे,” विट्टोरी यांनी न्यूज18 ला सांगितले. त्याला कोविड झाला होता. तर, तो उद्या सकाळी येईल आणि त्यानंतर आम्ही त्याची प्रकृती कशी आहे ते पाहू. ”
IPL 2025 : का होत आहे एमएस धोनी सोशल मिडीयावर ट्रोल? समोर आले मोठे कारण
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. त्यांच्या जाण्यानंतर, ते परततील की नाही हे माहित नव्हते कारण दोघांनाही ११ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळायचे आहे. तथापि, सनरायझर्स हैदराबादने हेड आणि कमिन्स उर्वरित सामन्यांसाठी संघात सामील होतील याची पुष्टी केली आहे. हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि २५ मे रोजी त्यांचा शेवटचा लीग सामना खेळेल, ज्यामुळे त्यांना WTC साठी तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.