IND vs AUS: Travis Head, who was a headache for India, was eliminated; Varun Chakravarty's magical ball and..
IND vs AUS : दुबईत आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमी फायनलचा थरार सुरू आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्माने या स्पर्धेत सलग 4 वेळा नाणेफेकीचा कौल गमावला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि कूपर क्रोनाली या सलामी जोडीने डावाची सुरवात केली. ट्रॅव्हिस हेड नेहमी भारतासाठी डोकेदुखी ठरत आला आहे. त्याने महत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून खेळताना भारताविरुद्ध खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्यामुळे आजही तो कसा खेळतो? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या जादुई चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात हेडने जोरदार फटका मारला आणि शुभमन गिलने त्याचा सुंदर झेल पकडला. ट्रॅव्हिस हेड 33 चेंडूमध्ये 39 धावा करून बाद झाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सर्व सामने भारताने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले आहेत. आज सूरु असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा सेमी फायनल सामना देखील याच मैदानावर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि कूपर क्रोनाली या सलामी जोडीने डावाची सुरवात केली. ऑस्ट्रेलियाला कूपर क्रोनालीच्या रूपात पहिला धक्का बसला. क्रोनालीला मोहम्मद शमीने 0 धावांवर तंबूत परत पाठवले. याआधी शमीच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडच्या बॅटची कळ लागून चेंडू काही वेळ हवेत होता. शमीने तों झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र तों झेल पकडून शकला नाही. ट्रॅव्हिस हेडला ते पहिले जीवनदान मिळाले आणि त्यांतर त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम राखत धावगती वाढवायला सुरवात केली.
ट्रॅव्हिस हेडने नेहमीच भारतासाठी डोके दुखी ठरत आला आहे. या सामन्यातही त्याने आक्रमक फटके मारायाला सुरवात केली होती. तो ३९ धावांवर असताना वरुण वरुण चक्रवर्तीचा चेंडू खेळून काढला परंतु पुढील चेंडूवर तो मोठा फटका मारण्याचा मोह आवळू शकला नाही आणि शुभमन गिलने त्याचा झेल पकडला. त्यावेळी भारतीय खेळाडूंसह भारतीय चाहत्यांनी एकच सुटेकचा श्वास सोडला. ट्रॅव्हिस हेडने 33 चेंडूमध्ये ३९ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ५ चौकार आणि 2 षटकार लागावले.
२०२३मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या फायनल सामन्यात ट्रॅव्हिस हेडने १२० चेंडूत १३७ धावा चोपल्या होत्या. यामुळे भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंग पावले होते. त्याने आधी देखील आपल्या फलंदाजीने भारताला अडचणीत आणले होते. जून २०२३ च्या सुरुवातीला, त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात १६३ धावांची निर्णायक खेळी खेळली होती, ज्यामुळे ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाचा २०९ धावांनी दणदणीत विजय झाला होता. आयसीसीच्या प्रमुख अंतिम सामन्यांमध्ये सलग दोन वेळा ट्रॅव्हिस हेडने दमदार प्रदर्शन करत भारताला विजेतेपदापासून लांब ठेवले होते. त्यामुळे असं म्हटलं जातं की ट्रॅव्हिस हेड हा नेहमीच भारतासाठी डोकेदुखी ठरत असतो.
हेही वाचा : Champion Trophy 2025 : भारताच्या सेमी फायनल विजयाने पाकिस्तानला बसणार ‘हा’ मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय?
ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्ध त्याने एकदिवसीय सामन्यात नऊ डावांमध्ये ४३.१२ च्या सरासरीने आणि १०१.७६ च्या स्ट्राईक रेटने ३४५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने सलामीवीर म्हणून त्याने केवळ चार डावांमध्ये ११८.३२ च्या स्ट्राईक रेटने २२६ धावा करून सरासरी ७५.३३ राखली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा