भारताच्या सेमी फायनल विजयाने पाकिस्तानला बसणार 'हा' मोठा धक्का(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IND vs AUS Semi-Finals: आज दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत सलग चार वेळा नाणेफेक हरला आहे. हा सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजच्या सामना जो संघ बाजी मारेल तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. अशातच भारताचा सेमी फायनलचा विजय मात्र पाकिस्तानचे आर्थिक गणित बिघडवणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताच्या पराभवासाठी नक्कीच प्रार्थना करणार आहे.
वास्तविक पाहता, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे. परंतु, भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भारताचे सारे सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. या परिस्थितीत आज होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला तर मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसणार आहे.
हेही वाचा : IND vs AUS : कॅप्टन स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून करणार फलंदाजी, जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्व सामने भारताने दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळले आहेत. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा सेमी फायनल सामना देखील याच मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचला तर या आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामनाही दुबईतच खेळवला जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे महसुलात मोठे नुकसान होणार आहे. याच कारणामुळे भारताचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर पडेल. त्यासाठी भारताच्या पराभवासाठी पाकिस्तान प्रार्थना करणार आहे. कारण, जर भारत अंतिम फेरीत पोहचला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना हा लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
हेही वाचा : Champions Trophy 2025 : कोणाचं फिरकी डिपार्टमेंट जास्त मजबूत, भारत की ऑस्ट्रेलिया कोण गाठणार अंतिम फेरी?
अधिक माहिती अशी की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवार होण्यापूर्वी, पाकिस्तानमध्ये स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले होते. ज्यामध्ये सुमारे 561 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातच पावसामुळे साखळी फेरीतील बरेच सामने पूर्ण रद्द करावे लागले आणि आता भारताने फायनलमध्ये प्रवेश केल्यास पाकिस्तानी बोर्डाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे या आयसीसी ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला एकापाठोपाठ धक्के बसळे आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दर्शवला होता, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात आले. त्यानंतर साखळी फेरीतील सामने गमावून पाकिस्तान संघ स्पर्धेतूनच बाहेर झाला, त्यामुळे पाकिस्तान संघावर सर्व स्तरावरून टीका झाली. आता मात्र भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर पाकिस्तानचा आत्मा नक्कीच हादरणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा