फोटो सौजन्य – X
भारताचा संघ सध्या इंग्लडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे, टीम इंडीयाचा आता शेवटचा सामना शिल्लक आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये 1 सामना जिंकला आहे त्यामुळे भारताच्या संघाला या मालिकेचा शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. भारताचा संघ इंग्लड दौऱ्यानंतर आशिया कप 2025 खेळणार आहे. त्याआधी आशिया कपमध्ये खेळणारे तीन संघ हे ट्राय सिरीज खेळताना दिसणार आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने युएईमध्ये होणाऱ्या टी२० तिरंगी मालिकेला मान्यता दिली आहे.
बोर्डाने या टी२० तिरंगी मालिकेत सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तान व्यतिरिक्त, त्यात पाकिस्तान आणि युएईचा समावेश आहे. हे तिन्ही संघ गट टप्प्यातील सहा सामन्यांमध्ये एकमेकांसमोर येतील. गट टप्प्यातील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. टी-२० त्रिकोणी मालिका २९ ऑगस्टपासून सुरू होईल आणि अंतिम सामना ७ सप्टेंबर २०२५ रोजी खेळवला जाईल. ही मालिका तिन्ही संघांना ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया कपच्या तयारीसाठी मदत करेल.
या मालिकेचे सर्व सामने शारजाह येथे खेळवले जाणार आहेत.
या टी-२० त्रिकोणी मालिकेतील सर्व सामने शारजाहमध्ये खेळवले जातील. तिन्ही संघांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. सध्या पाकिस्तान वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. जिथे ते तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना जिंकून पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
आशिया कप ९ सप्टेंबरपासून खेळला जाईल हे लक्षात घेण्यासारखे आहे की आशिया कप ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे. ८ संघ जेतेपदासाठी स्पर्धा करतील. भारताने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहता येईल.