Photo Credit : ICC
West Indies vs Pakistan match report : नुकतीच वेस्टइंडीज संघाची त्यांच्या होम ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका पार पडली. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांना घरच्या मैदानावर एकही सामना न गमावता मालिका जिंकून लाजिरवाणा पराभव वेस्टइंडीज संघाला पत्करावा लागला. आज पासून वेस्टइंडीज संघाची पाकिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची t20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेचा आज पहिला सामना पार पडला. आणखी एकदा वेस्टइंडीज च्या संघाने निराशाजनक कामगिरीने त्यांच्या चाहत्यांना निराश केले आहे.
वेस्टइंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये १–० अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्यांच्या संघात बदल केले होते, परंतु तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्यांना क्लीन स्वीप केले होते. त्याचप्रमाणे, कांगारू संघाने तीन कसोटी सामन्यांमध्ये त्यांना ३-० ने पराभूत केले होते.
Saim Ayub scored a half-century and picked up a pair of wickets to help Pakistan clinch the opening T20I against the West Indies in Florida 💪
Scorecard 👉 https://t.co/Sr9TNNabQ8 pic.twitter.com/WoWfDul0XZ
— ICC (@ICC) August 1, 2025
वेस्टइंडीज संघाचा घरच्या मैदानावर हा सलग आठवा पराभव आहे या संघाने मागिल झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेमध्ये देखील निराशाजनक कामगिरी केली होती. दुसरीकडे, पाकिस्तानने विजयासह १-० अशी आघाडी घेतली. खरं तर, पाकिस्तानचा युवा फलंदाज सैम अयुबने मालिकेच्या पहिल्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना धुडकावून सिरीजमध्ये आघाडी संघाला मिळवुन दिली आहे. अयुबने फक्त ३८ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्यांच्या आक्रमक सुरुवातीमुळे पाकिस्तानी डावाला (WI विरुद्ध PAK पहिला T20I) वेगवान गती मिळाली आणि मधल्या फळीने ती गती कायम ठेवली. पाकिस्तानचा सलामीवीर फरहान फक्त 14 धावा करू शकला.
फखर जमानने २८ धावा आणि हसन नवाजने २४ धावा केल्या. अशाप्रकारे पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १७८ धावा केल्या. विंडीज संघाकडून शमार जोसेफने तीन बळी घेतले, तर होल्डर-हुसेन आणि रोमारियो यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. शाई होपच्या नेतृत्वाखालील कॅरेबियन संघ पुन्हा एकदा टी-२० सामन्यात अडचणीत आला. संपूर्ण संघ २० षटकांत १६४ धावांवर गारद झाला. जॉन्सन आणि अँड्र्यू यांनी उत्तम सुरुवात केली होती. दोघांनीही ३५-३५ धावा केल्या, पण त्यानंतर विकेट पडू लागल्या.
धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटावर युजवेंद्र चहलने पहिल्यांदाच सोडले मौन, ‘मी आयुष्यात कधीही फसवणूक…’
कर्णधार शाई होप फक्त २ धावा काढून बाद झाला. गुडाकेशला त्याचे खातेही उघडता आले नाही. जेसन होल्डरने नाबाद ३० धावा केल्या, तर शामरने २१ धावांची नाबाद खेळी केली. अशाप्रकारे, विंडीज संघ फक्त १६४ धावा करू शकला. वेस्ट इंडिजचा हा सलग सहावा टी२० पराभव आहे.